रवींद्र महाजणी

रवींद्र महाजणी – भावपूर्ण श्रद्धांजली.

रवींद्र महाजनी

 

सुप्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या नुकत्याच झालेल्या निधनाच्या बातमीने मराठी चित्रपट सृष्टीत त्यांच्यातील एक उत्कृष्ट प्रतिभा गमावल्याबद्दल शोक व्यक्त होत आहे. महाजनी यांचा मृतदेह शुक्रवारी तळेगाव दाभाडे येथील फ्लॅटमध्ये आढळून आला. ते तळेगाव दाभाडे येथील फ्लॅटमध्ये काही काळापासून भाड्याने राहत होते. शेजारी राहणाऱ्या रहिवाशीयांना त्यातून वास येत होता, याबाबत त्यांनी पोलिसांना कळवले असता पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली परंतु त्यावेळी त्यांना ते मृत अवस्थेत आढळून आले. महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मीर यांना पोलिसांना ही माहिती कळवल्यानंतर अभिनेता गश्मीर महाजनी यांनी मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाजनी यांचे दोन ते तीन दिवसांपूर्वी निधन झाले असावे असा अंदाज व्यक्त केला आहे.
रवींद्र महाजणी यांनी प्रामुख्याने मराठी, हिंदी व गुजराती चित्रपटांमध्ये अभिनय केला. व्ही. शांताराम-दिग्दर्शित झुंज या मराठी चित्रपटाद्वारे त्याने चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले होते. अनेक दशकांच्या कारकिर्दीत खास करून 1975 ते 1995 हा काळ गाजवला. महाजनी यांनी आपल्या कामगिरीने आणि नैसर्गिक अभिनयाये प्रेक्षकांना भुरळ घातली आणि मराठी चित्रपट रसिकांच्या हृदयात स्वत:साठी स्थान निर्माण केले ते आजही टिकून आहे. वेड मराठी चित्रपट
रवींद्र महाजनी यांचा अभिनय अतुलनीय होता आणि त्यांनी सहजतेने पात्रांना रुपेरी पडद्यावर जिवंत केले. त्यांनी प्रतेक वेळी प्रतेक पात्राला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि यामुळेच ते प्रेक्षक आणि समीक्षकांमध्ये आवडते बनले. मार्मिक नाटक असो, किंवा वडील, नवरा, भाऊ अस जबाबदरीच पात्र असो किंवा हलकीफुलकी कॉमेडी असो, महाजनी यांच्या उपस्थितीने त्या पात्राला न्याय मिळाला.
आपल्या संपूर्ण कारकिर्दीत, महाजनी यांनी भरपूर मराठी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. त्यातील काही गाजलेले म्हणून मुंबईचा फौजदार. जिवासखा, पानिपत, थोरली जाऊ, गोंधळात गोंधळ, यांना ओळखता येईल. पानीपत मध्ये त्यांचा मुलगा गशमिर आणि रवींद्रजी यांनी सोबत काम केले. चित्रपटसृष्टीच्या पलीकडे महाजनी यांची प्रतिभा बहुआयामी कलाकार म्हणून विस्तारलेली आहे आणि म्हणूनच त्यांचे स्थान आजही मराठी सिने सृष्टि मध्ये मजबूत आहे. ( ABP Majha New )
रवींद्र महाजनी यांच्या निधनाची बातमी मराठी चित्रपटसृष्टीत आणि त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात घुमत असतानाच, एक प्रतिभावान अभिनेता आणि खरा आयकॉन म्हणून त्यांचा वारसा कायम राहील. मराठी चित्रपटसृष्टीतील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.
या दुःखाच्या काळात, आम्ही रवींद्र महाजनी यांच्या कुटुंबीय, मित्र आणि चाहत्यांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

.

हे सुद्धा वाचा .

पंजाबराव डख 📌

छत्रपती शिवाजी महाराज 

मित्रांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *