नमस्कार मित्रांनो पंजाबराव डख हे नाव आपल्या परिचयाचं झालेलच आहे. त्यांना तुम्ही या अगोदर बातम्या, tv किंवा इतर प्रसार माध्यमांमध्ये त्यांना ऐकलं असेलच यात नक्कीच शंका नाही. ते ओळखले जातात त्यांच्या अचूक हवामान अंदाजा बद्दल. त्यांचा हवामान अंदाज हा बऱ्यापैकी खरा ठरतो आणि त्यामुळे शेतकरी होणाऱ्या नुकसानापासून वाचतात. शेतकऱ्यांसाठी ते देवदूतच आहेत या वर डोळे झाकून विश्वास ठेवण्यास काहीच हरकत नाही. तर याच संबंधी माहिती आणि त्यांचा जीवन परिचय आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.
पंजाबराव डख – नावाचं औषध.
पंजाबराव डख साहेब हे ओळखले जातात त्यांच्या अचूक हवामान अंदाजाबद्दल. काही वेळा हवामान खात्याला सुद्धा लाजवेल एवढा त्यांचा अंदाज बरोबर येतो आणि याच कारणामुळे ते शेतकऱ्यांसाठी देवदूत ठरलेले आहेत.
पंजाबराव डख – यांचं गाव.
पंजाबरावांच गाव हे परभणी जिल्ह्यातील ( सेलू ) गुगळे/धामणगाव येथील ते शेतकरीपुत्र आहेत. शेतकरी घरातच जन्म झाल्यामुळे हवामानाचा अंदाज असणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने खूप आवश्यक असते त्यामुळे ते पिकांचे होणारे नुकसान वाचवू शकतात. योग्य पीक’ योग्य वातावरणात: हवामानात घेऊ शकतात. त्यामुळे ते लहानपणापासून पावसाच्या अंदाजावर घरच्यांशी आजूबाजूच्या शेतकऱ्यांशी हवामानावर चर्चा करायचे. त्यांची निरीक्षण ते स्वतः नोंद करायचे आणि अनेकदा त्यातून होणारे अंदाज हे बरोबर ठरायचे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना अजून पावसाचा अंदाज मिळायचा आणि होणाऱ्या शेतीच्या नुकसानापासून बचाव व्हायचा. इथूनच ते पंचक्रोशी मध्ये प्रसिद्ध झाले.
पंजाबराव डख हे हवामान अंदाज नेमका कसा लावतात ?
पंजाबराव हे हवामानाचा अंदाज सांगण्यासाठी संगणकाचा वापर करतात. आणि त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे त्यांचा त्याबाबत असलेला अनुभव आणि अभ्यास. ते वर्षानुवर्ष अंदाज लावतायत. त्यावर अभ्यास करतायात. त्यामुळे त्यांचा ठरणारा अंदाज हा खरा ठरतो आणि हवामान खात्याला सुद्धा काही वेळा मागे पाडतो. त्यामुळे खऱ्या अर्थाने ते शेतकऱ्यांसाठी देवदूतच आहेत यात मुळीच शंका नाही.
पंजाबराव डख – यांचे शिक्षण.
साहेबांचे शिक्षण हे जिल्हा परिषद शाळेमध्ये झालेले आहे. पुढे त्यांनी इ डी टी आणि सी टी सी पूर्ण केले आणि सध्या ते जिल्हा परिषद शाळेवर अंशकालीन शिक्षक म्हणून रुजू आहेत.
पंजाबराव यांच्या बद्दल इतर माहिती.
पंजाबराव डख साहेब हे अचूक हवामानाबद्दल ओळखले जात असले तरीही त्यांची दुसरी बाजू- ते यशस्वी शेतकरी आहेत. ते स्वतः शेती करतात आणि त्यातून जास्तीत जास्त उत्पन्न घेतात. त्यांना एकूण 200 क्विंटल पर्यंत शेतमाल होतो, त्यामध्ये ते सोयाबीन, हरभरा अशा प्रकारचे उत्पन्न घेतात. ही माहिती त्यांनी अलीकडेच एका मुलाखतीमध्ये दिली होती. त्यामध्ये त्यांनी हे सुद्धा सांगितलं होतं की त्यांना सहा ते आठ लाख रुपये उत्पन्न होतं आणि त्यांना एकूण दहा एकर शेती आहे आणि ते पूर्ण शेती हवामान अंदाजावर करतात.
पंजाबराव डख वाद – विवाद.
पंजाबराव डख साहेबांचे अनेक व्हाट्सअप ग्रुप आहेत आणि सोबत यूट्यूब चेनल देखील आहे. त्या माध्यमातून ते शेतकऱ्यांना आत्मविश्वासाने अचूक हवामान अंदाज देतात. त्यामधून याचा शेतकऱ्यांचा फायदा नक्कीच होतो परंतु यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे बऱ्याच वेळा व्यापारी आणि साहेब यांच्यामध्ये वाद दिसून येतो आणि त्यांच्या ऑडिओ क्लिपा बऱ्याच ह्या युट्युब फेसबुक वरती वायरल देखील झालेला आहेत. तरीही त्यांचा फायदा जास्त करून शेतकऱ्यांना झालेला आहे. त्यामुळे शेतकरी सतर्क राहतात- आपली कामे वेळेवर करतात. त्यामुळे पिकांचे नुकसान होत नाही’ पीक पाणी वाचले जाते.
पिके सुरक्षित राहतात शेतकऱ्यांना पूर्वसूचना मिळाल्याचा हा फायदा होतो. त्यामुळे जरी काही बाबतीत वाद विवाद होत असतील तरीही नक्कीच शेतकऱ्यांसाठी ते देवदूतच आहेत.
राज्य शासनाच्या कृषी सल्लागार समितीत नियुक्तीची मागणी.
भूमिपुत्र पंजाबराव डख यांची राज्य शासनाच्या आत्मा अंतर्गत राज्यस्तरीय प्रगतिशील शेतकरी या गटातून कृषी सल्लागार समितीमध्ये नियुक्ती करावी अशी मागणी ( पाथरी / सेलू – विधानसभा ) माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांच्याकडे केली त्यामुळे नक्कीच याचा फायदा शेतकऱ्यांना तर होईलच सोबत डख साहेब यांच्या निस्वार्थी सेवेचा सन्मान होईल अस देखील म्हणता येईल.
हे सुध्दा पहा ⬇️
पंजाबराव डख – youtube Channel ⏪
पंजाबराव डख – fecebook ⏪
पंजाबराव डख साहेबांची अलीकडे ( साभार – Abp majha ) द्वारे घेतलेली मुलाखत नक्की पहा. खूप छान आणि प्रेरणादायी प्रवास आहे.लाखो लोकांचे देवदूत बनलेले पंजाबराव डख साहेब आहेत तरी कोण याची नक्की माहिती मिळेल.
( साभार – मुलाखत abp majha द्वारे घेण्यात आलेली आहे याच सर्व श्रेय त्यांना आहे )
Pingback: पंजाबराव डख यांचे भाकित : चक्री वादळाचा अडथळा आणि महाराष्ट्रात मान्सून सक्रियतेबाबत. - Activenama.com
Pingback: पंजाबराव डख यांचे भाकित : चक्री वादळाचा अडथळा आणि महाराष्ट्रात मान्सून सक्रियतेबाबत.