प्रेमपत्र - १५ 
प्रेम आसन आणि प्रेमात आसन फरक असतो नाही .. ??
तसा आगोदर वाटत नाही पण नंतर जस जसा वेळ जाईल तस तस जाणवायला लागत ;
हे जाणवायला लागत की तूच खुप ऍडजस्ट करतेय कारण तू प्रेमात आहेस; मी फक्त दर वेळी कारण देतोय –
प्रेम आहे प्रेम आहे`अस सांगतोय खर पण माझ्या कुठल्याच कृतीतून ते प्रेम दिसून येत नाही की ‘हो मी प्रेम करतोय आणि त्याही पेक्षा जास्त प्रेमात आहे _ ते प्रेम जगतोय आणि तुझ्या सोबतचा प्रत्येक क्षण साजरा करतोय ‘..
पण कुठे??
कुठे साजरा करतोय शब्दात आणि एकमेकांनपासून दूर फक्त.. विरहात सुद्धा प्रेम असत अस मनाला पटवून देऊन- इथे जगतोय .. 
ना वेळेवर बोलणं होतंय ना तुझ्यासाठी वेळ देणं होतंय.. संवाद हरवत जातोय तसा मी दूर जातोय’
असच वाटत असेल तुला पण तस नाही ग..
.
माझं खरच खूप प्रेम आहे तुझ्यावर … मी वेळेअभावी जास्त बोलत नसेल किंवा काही कारण असतील ज्या मुळे माझे शब्द फुटत नसतील पण मला माहितीये तू घेतेस समजून.
–
तुझं वाट पाहणं.. तुझं व्याकुळ होणं… कारण नसताना तुझं भांडण आणि त्या भांडणाच कारण मी आसन- अस नाही की मला कळत नाही सगळं कळत ग मला~ पण एक सांगू लहान पनी साद खेळणं तुटल्यावर रडणारी मुलं मोठेपणी स्वप्न तुटल्यावर सुद्धा हसत राहतात .. कारण फक्त एकच जबाबदाऱ्या – याच्या ओझ्याखाली माणस खूप दबून जातात_ एव्हाना मीच दबून गेलो आहे आणि माझ्यामुळे माझ्यासाठी तू सगळं सहन करतेय आणि या सगळ्यामध्ये तुझं मरण होतंय ..
कळतंय सगळं कळतंय मला … 
–
आता या वेळी तर तुला मी वेळही मागू शकत नाही की कुठलं कारणही देऊ शकत नाही . इतक्या दिवस सॉरी म्हणून मी वेळ मारून नेली आणि माफ करून तू हृदयात सामावून घेतलंस.
आता तुझ्या समोर आलो तर एखाद्या गुन्हेगारा सारखा उभा असेल ग मी आणि अस नाही यायचं मला तुझ्या समोर …
.
आता समोर येईल तर फक्त ‘.. तुझा म्हणून … तुझ्या साठी
माझ्या कडे बोलण्यासाठी शब्द नसतील पण माझे दोन्ही हात मोकळे करून गुडघ्यावर बसून तुला इशार्यानेच सांगायचं आहे की “या नंतरचा तुझ्या हकाचा वेळ -फक्त तुझासाठीच ..” …
–
‘आणि तू डोळ्यात बघायचं नाही आ माझ्या: मला रडायला येत मग उगाच .’. 

.
.
ऐकणा- सॉरी ; नेमही प्रमाणे याही वेळेस थोडा उशीरच झाला-
घेशील थोडं समजून प्लिस . ??
–
मितवा ..