प्रेमपत्र - २ 
hi……
मग कशी आहेस खुश अशील ना आता तरी ? खूप त्रास होत होता ना माझा म्हणून सारख टाळत होतीस, कितीही समजून सांगितलं तरी तसच’ तू नाहीस सुधरणार कधीच , जाऊदे तुझ व्यक्तिगत आयुष्य आहे काय बोलू मी तरी,
पण एक सांगू – एवढं पण एखाद्या सोबत वाईट नाही वागायचं की समोरच्याच्या मनातून आपण कायमच उतरून जात असाल “
अस नको वागू परत कुणासोबत, मी घेतो प्रत्येक गोष्ट तुजी समजून पण सगळेच जण ‘मी’ नाही ना ,
ते नाहीत समजून घेणार तुला, काळजी वाटतेय म्हणून सांगतोय…
आठवण येतेय तुझी काळजी वाटतेय,कशी अशील, काय करत अशील म्हणून. फक्त मोठी झालीस काय स्वतःची काळजी घेता येत नाही तुला , माहीत आहे मला सगळ्यांची काळजी घेण्याच्या नादात स्वतः ची काळजी घ्यायला विसरतेस तू …..
काळजी घे ,
उन्हात बाहेर नको निघू खूप ऊन आहे सद्या आणि
रोज रात्री तुझं डोकं दुखत तुझ माहीत आहे मला चष्मा वापर राहून जाईल बग, आणि खर सांगू तू चष्म्या घातल्यास खूप छान दिसतेस खूप,
आणि रात्री गाणे ऐकत बसतेस ना माहितेय मला, सांगितलं तुज्या मैत्रिणीने, लवकर झोपत जा सकाळी लवकर उठाव लागत ना मग …. आणि अजून ,,,,,,
आजून काही नाही प्रत्येक गोष्ट मी सांगायला तू काय लहान नाहीस आता, आणि अस पण मोठी झालीस म्हणून तर साथ सोडलीस ना तुला वाटायला लागलं आता मला काय कुणाची गरज , जाऊदे , असच वाटत या वयात मी पना येतोच थोडा , जाऊदे ,,,,,
अजून काही नाही बस खुश आहे मी पण ,
नको काळजी करू सगळं ठीक आहे आणि माझा अभयस वागेरे पण ,
.
हो, माहीत आहे की,
तूझ्या पर्यंत आता माझा आवाज पोहोचणार नाही,
पण मनातलं सगळं सांगू कुणाला, तुला माहीत आहे ना मला किती सवय आहे बडबड करायची ,
माझा मितवा तर तू आहेस, तूच नाहीस मनल्यावर बोलणार कुणाशी, #fb वर #post टाकणं पण बंद केलय, तुज्यासाठीच तर टाकत होतो आता तूच नाहीस म्हणल्यावर टाकणार कुणासाठी ,
,
जाऊदे,
जर चुकून माज्या कानावर आलं ना नकटे तू ठीक नाहीस म्हणून तर तिथं येऊन एक नाकावर बुक्की मारेल बग,
तू फक्त तुझी नाहीस माझी पण आहेस कळाल,
जाऊदे किती बडबड करू मीच ,
होईल ना भेट एकदा परत तेव्हा बोलेल पुढचं,
बघू नंतर, तू भेटशील तेव्हा,खूप काही बोलायचे आहे . .
थोडे फार भांडण आणि,खुपसे प्रेम करायचे आहे .. “
खूप आठवण येतेय तुझी .. खूप ..
कोणत्या शब्दात सांगू तूच सांग,
खूप एकटा पडलोय, माहीत होतं, एकटा तर मी एकणा एक दिवस पडणार पण इतक्या लवकर ही वेळ येईल असं वाटलं नव्हतं,,
कदाचित वेळ ठीक नाही म्हणून आपन दूर झालोत एकमेकांपासून, होईल ठीक आज ना उद्या जाऊदे,
तुझी खूप इछया आहे ना मी खूप मोठं व्हावं ,
एक दिवस नक्की खूप मोठा होईल बग तू आणि तेव्हा पळत येईल तुज्याकडे, तुझ्या समोर उभा असेल हातात एक छान गिफ्ट घेऊन तुज्यासाठी ,
तुझ्या डोळ्यात पाणी येईल बग तू,
आणि तू स्वतःहुन मला मिठी मारशील ,
असंच होईल नक्की बग तू ,,,,,
.
miss u so much ,,,😭
.
मितवा .. ❤️ ( २०१६ )