" आई " 🪶

लहान असताना सारखा आजारी असायचो मी’ सारखं काही ना काही दुखणं मागे लागलेल.
नेमक आठवत नाही पण चौथी पाचवी मध्ये असेल तेव्हा आणि त्या दिवशी सुद्धा अंगभरून ताप होता. रात्रीच्या वेळी “आई मला उद्या डबररोटी ( ब्रेड / पाव ) पाहिजे म्हंजे पाहिजे बर”
अस म्हणत होतो आणि थोड्याशा विनवणी वर तर आई तयार झाल्या.
आई सकाळी लवकर उठून आवरतात आणि आधी देवपूजा_नंतर सगळी कामं आणि हिच दिनचर्या
आजही आहे.
मी मस्त ८,९ पर्यंत लांबून द्यायचो अशी पण शाळा १० लां असायची_
पण उठवलं आईने त्या दिवशी पहाटच्यालाच` पण मी कश्याचा उठतो; तो पो पो वाजवत जात होता दारावरून मला कळत होत पण झोपने डोळे उघडत नव्हते.
आईने तुळशीला पाणी घालत मला मोठ्या आवाजात_ “ये उठ ना: ते जाईल मग डबररोटी वाला मला नको बोलू मंग” ‘तुम्ही घ्या न ‘ अस म्हणून मी कूस बदली फक्त… –
पण उठवलं आणि हातात पैसे घालून पाठवलं मला तसच. मी लादी पेपर मध्ये गुंडाळून माझं मी येतच होतो तर दुसऱ्या ऐका मुलाच्या हातातील त्याचे पाव खाली पडले. त्याच्या आईने त्याला लांबून बघितलं त्या त्याला ओरडत होत्या. तर “तुझ्यामुळ माझे पाव पडले” अस म्हणून तो माझ्या अंगावर धाऊन आला.
त्याला मी ‘माझा काय संबंध’ म्हणून धक्का दिला तर त्याची आई ओरडत आली आणि त्या काकूने त्याला समजून सांगायचं सोडून माझ्याच कानाखाली लावली. आणि ते पाहिलं आमच्या आईसाहेबांनी
आणि मग ‘मला फक्त माझ्याच आईच नाही तर जगातल्या सगळ्याच आईच रूप त्याच्यात दिसल’ अस म्हणायला हरकत नाही. –

मी सातव्या महिन्यातील आहे आणि त्यात लहानपणी प्रमाणापेक्षा जास्त कुपोषित होतो- त्यामुळे आईने तळहाताच्या फोडा प्रमाणे जपलय, मला आमच्या आईने हात लावणं तर दूर साध कधी मोठ्या आवाजात बोलत नाहीत: तिथं दुसऱ्याने हात लावलेला कस काय सहन करतील त्या ?? .

ती देवपूजा राहिली बाजूला_आई पळत आल्या आणि जे सुरू झाल्या.
त्या काकूच अख्ख खानदान ऐक करून टाकल- येवढ्या मोठ्या आवाजात भांडत होत्या; नुसत्या शिव्या. लोक झोपेतून उठले पण नव्हते ह्यांच्या आवाजाने जागे झाले.
ती बाई शांत झाली तरी आईच चालूच’ ती बाई बोलून थकली. रडायला लागली.. तरी आईच ऐकच
“तु माझ्या पोराला हात कस काय लावलास` तू लावलासच कस काय हात “?? 😡🤬
परत सुरू आईच… .
आई पुढे होऊन भांडत होत्या आणि मी आईच्या पाठीमागे लपून उभा होतो फक्त.
माझे डोळे भरून आले होते आणि हातपाय कापत होते, .
त्यांच्या घरची काही लोक आली आमची काही आणि बोलून सोडवलं मग त्यांनी …
आईचा लालबुंद चेहरा बघून आईच्या डोळ्यात डोळे घालायची सुद्धा हिंमत राहिली नव्हती. आई हाताला धरून घरामधे घेऊन गेल्या आणि दरवाजा बंद केला.
त्यांच्या काय मनात आल काय माहित, मला जवळ घेतलं, मिठी मारली आणि रडायला लागल्या_ थोडा वेळ गेल्यानंतर माझ्या गालावर दोन तीन स्नेहाच्या पप्या उमटल्या तेव्हा कुठे माझी सुटका झाली…🥹 –

त्या आधी किंवा त्या नंतर कधीच आईला तेवढं रागात पाहिलेलं नाही त्यामुळे तेव्हाचा तो चेहरा विसरू नाही शकतं.
कितीतरी दिवस मी घरात आईला भित भित राहत होतो.
आईने आज पर्यंत जरी हात उचला नसला तरी आपला नंबर कधीही लागू शकतो एवढी खात्री होती:
पण तस आज पर्यंत काहीच झाल नाही…
तेव्हा भीतीपोटी आईला बोलणं टाळायचो. पण आई कडे जादू आहे माझ्या आई शब्दांमध्ये पकडतात’
म्हंजे आज जरी मी कधी आईला बोलायचं टाळत आहे अस आईला वाटलं तर त्या शब्दाच्या बदल्यात शब्द येईल_ म्हंजे पूर्ण विराम येईल अशे वाक्य वापरत नाहीत.
प्रतेक वाक्यात प्रश्न नाहीतर माझ्याकडुन मी काहीतरी बोलच पाहिजे अशे वाक्य वापरतात
त्यामुळे संवाद चालूच राहतो. –
आताही तसाच संवाद चालू आहे.
असाच म्हंजे आईला वाटत आहे की मी बोलायचं टाळतोय कारण मागच्या काही महिन्यात काही गोष्टी अश्या घडल्या ज्यामुळे माझी मानसिक स्थिती ठीक नाही.
त्यामुळे थोडा शांत झालो आहे तर त्यांना अस वाटत आहे मी त्यांना बोलायचं टाळतोय,
त्यामुळे दिवसातून चार पाच वेळा कॉल होतोय
फक्त माझ्या सोबत संवाद साधण्यासाठी . ❤️🌿


#आई
 

15 / 07 / 2024 

मित्रांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *