आत्मविश्वास वाढवण्यासाठी या 10 सवयी स्वत: ला लावा .

आत्मविश्वास वाढवण्यासाठी या 10 सवयी स्वत ला लावा. 

1 ) स्वतची काळजी घ्या – आत्मविश्वास वाढवण्याची पहिली पायरी हीच असेल की स्वतची काळजी घ्या. तुमच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्याची काळजी घेतल्याने तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो, यामध्ये वेळेवर झोपणे उठणे व्यायाम करणे या गोष्टींचा समावेश असेल. आत्म विश्वासाने भरलेल्या माणसाची ओळख ही त्याची शरीर रचना आणि आरोग्य असते त्यामुळे स्वतची काळज घ्या .   

 

2 ) व्यायाम करा – रोज दिवसातून अर्धा तास तरी व्यायाम करा . त्यामुळे दिवस भर कामात उत्साह राहील आणि उत्साह असला की काहीतरी नवीन शिकण्याची व नवीन करण्याची तयारी विचारशक्ति मध्ये बनून राहते, त्यामुळे दिवसातून अर्धा तास तरी व्यायाम करणे आवश्यक राहील .  

 

3 ) छोटे छोटे गोल सेट करा. – आपल्या दैनंदिन जीवनात छोटे छोटे गोल / ध्येय ठरवा त्यामुळे काम झाल्याचा आनंद मिळेल आणि तो क्षण साजरा करा म्हणजे स्वतला बक्षीस स्वरूपात चॉकलेट आणि किंवा तत्सम पदार्थ देऊन त्यामुळे पुडच्या कामासाठी प्रेरणा मिळते आणि हे मी करू शकतो असा आत्मविश्वास निर्माण होईल. 

 

4 ) नविन् गोष्टी शिका – नेहमी नवीन नवीन गोष्टी शिकत रहा तशी सवयच स्वतला लाऊन घ्या नवीन गोष्टी शिकल्या मुळे आपल्या नवीन काही करण्याची प्रेरणा मिळते किंवा आपण त्या पेक्षा उत्कृष्ट करू शकतो आणि त्या साठी आपण काय केल पाहिजे हे विचार आपल्या आत्मविश्वासाला बळकटी देतात . 

 

5 ) चांगल्या संगतीत रहा – जे लोक कारण देऊन प्रत्येक गोष्ट टाळतात त्यापेक्षा ती गोष्ट कशी करता येईल असा विचार करणाऱ्या लोकांच्या सानिध्यात रहा , त्यामुळे तुम्ही देखील सकारात्मक असाल आणि सकारात्मक माणूस नेहमी चौकस  बुद्धीचा असतो त्याच्या विचारांच्या जोरावर प्रत्येक गोष्टीसाठी तो मार्ग तयार करू शकतो. त्यामुळे अश्या लोकांच्या संगतीत राहिल्यास तुमचा आत्मविश्वास वाढण्यास प्रेरणा मिळेल . आत्मविश्वास

 

6 )  नकारात्मक विचार करणे टाळा – नकारात्मक विचार तुमची मानसिक स्थिति बिघडवीण्यामद्धे सर्वात पुढे असतात त्यामुळे तुम्ही मानसीक आणि शारीरीक दोन्ही बाजूने खचून जाता त्या पेक्षा एखाद्या संकटाला तोंड देताना हीच ती संधि जिथ मी स्वतला सिद्ध करु  शकतो अश्या विचाराने स्वतला त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी विचार करा आणि ही ताकत सकारात्मक विचारांमध्ये असते त्यामुळे नकारात्मक विचार करणे टाळा. 

 

7 ) जबाबदारी स्विकारा – आपल्यावर येणारी जबाबदारी टाळण्यापेक्षा ती कमी वेळात कशी कौशल्य पूर्ण पद्धतीने आपल्याला पूर्ण करता येईल त्या कसे लक्ष द्या, त्यामुळे तुम्हाला वेळे मध्ये काम करण्याची सवय लागेल वेळेची बचत सुद्धा होईल आणि जबाबदारी पूर्ण केल्यामुळे आनंद मिळेल पुढच्या कामासाठी प्रेरणा मिळेल. जबाबदारी पार पाडण्याची सवय तुम्हाला एका मोठया स्तरावर नेऊ शकते. त्यामुळे स्वत:ला नेहमी जबाबदार व्यक्ति आहात अश्या पद्धतीने तयार करा.  

 

8 ) ब्रेक घ्या – कोणतही काम पूर्ण झाल्या नंतर थोडा वेळ कामातून ब्रेक घ्या, चह किंवा  कॉफी घ्या.. पहिल काम संपल की लगेच दुसऱ्या कमाला हात घालू नका त्यामुळे तनाव निर्माण होईल आणि त्यामुळे मानसिक वर्तन बदलू शकत. त्यापेक्षा थोडा ब्रेक घ्या आणि नंतर दुसऱ्या कमाल सुरवात करा तुमच्या हे  लक्षात येईल की ब्रेक घेतयामुळे कामा मद्धे उत्साह आला आहे आणि तुम्ही पुनः जोमाने काम करू शकाल. 

 

9 )  चुकांमधून शिका – काही वेळ सर्व गोष्टींची पूर्तता करून सुद्धा काही चुका होतात तेव्हा त्यामुळे कुणाशी वाद  घालू नका किंवा स्वतला त्या बद्दल वाईट अनुभूति देऊ नका.ती चूक पुढच्या वेळी कशी होणार नाही या कडे लक्ष द्या , चुकांमधून शिका प्रत्येक चूक हा अनुभव असतो आणि अनुभवातूनच आपण शिकतो की बरोबर काय आहे?  त्या मुळे स्वतला चुकांमधून शिकण्या साठी सक्षम बनवा . 

 

10 ) स्वत: वर प्रेम करा – आयुषयामद्धे बरोबर व्यक्ति चुकीचा अनुभव देऊन जातात आणि चुकीच्या व्यक्ती बरोबर अनुभव देतात या दोन्ही परिस्थिति मध्ये स्वत: ला संभाळण अवघड असत.त्यामुळे काही वेळा आपल्या चुकीमुळे हे झाल ही गोष्ट मनाला न पटणारी असते आणि जेव्हा आपली चूक नसते तेव्हा तर आणखीन जास्त दुखावल्या जात . त्यावेळी स्वत विषयी नकारार्थी विचार बनायला लागतात तेव्हा हिच वेळ असते स्वताला समजून घेण्याची स्वत वर प्रेम करण्याची, आणि माझ्या मते हा सर्वात प्रभावी मार्ग असेल स्वत मध्ये आत्मविश्वास वाढीचा. 

 

लक्षात घ्या आत्मविश्वास हा अंतर्गत विषय आहे आणि अंतर्गत गोष्टी हाताळण्यासाठी महत्वाची गोष्ट असते आपल्या चांगल्या सवयी त्यामुळे वरील सवयी स्वत: मधील आत्मविश्वास वाढवण्यासाठी नक्कीच उपयोग पडतील . 

 

हे सुद्धा वाचा 🌿

 

पंजाबराव डख. 📌

जल प्रदूषण करणे आणि परिणाम. 📌

मित्रांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *