प्रेमपत्र १३

प्रेमपत्र 13 ( वाढदिवस )

प्रेमपत्र - १३ ( वाढदिवस ) २०१८ 🪶

मग कशी आहेस ??
आज वाढदिवस आहे माझा दरवर्षी प्रमाणे याही वर्षी तुझाच पहिला msg,
मग काय लगेच गायब मी खूप दूर आलो सगळ्या पासून सायंकाळी जाईल परत रूमवर , त्याच कारण अस की
खर सांगायचं तर वाढदिवस नाही करत साजरा मी ,दरवेळेस काहीतरी कारण काढून साजरा करायच टाळतो,
सोबत तू नाहीस ना म्हणून ,,,

वाढदिवसच काय कोणताच सण नाही साजरा करत, म्हणून तर गेल्या 3 वर्ष्यात दिवाळीला सुद्धा कधी गावाकडे नाही आलो,या वर्षी जे आलो होते ते फक्त तुला भेटण्यासाठी ,बाकी काहीच कारण नव्हतं ,
तुला नसतो भेटलो तर बर झालं असत ,सारखी तुझी आठवण येतेय त्या दिवशी पासून ,
तुला तर माझी आठवण पण येत नसेल ,खूप खुश अशील एकटीच, माझी कश्याला आठवण काढशील ,आठवण काढायला मी तुझा थोडी कुणी लागतो आणि लागत असतो तर अस एकट्याला नसतीस सोडून गेली ,
.
दरवेळी  मला तुझी आठवण येन आणि मी माझ्या मनाला दरवेळेस समजूत घालणं सोप्प वाटत का तुला ?
किती मन मारून जगाव लागत तुला काय कळणार  ,
मला नसेल  कधी वाटत माझी पण कुणी प्रेयसी असावी ,मी पण कुणाच्यातरी हातात हात घालून फिरावं ,माझ्या बाईक वर पण पाठीमागे मला कुणीतरी गच्च मिठी मारून बसावं ,माझी पण कुणीतरी काळजी घ्यावी आणि मी पण कुणावर तरी खूप प्रेम करावं …
वाटत ना खूप वाटत ,
पण काय बोलणार ना,अशी साथ सोडून जाणाऱ्या आपल्याच माणसाला …
प्रेम शिकवायचं आणि नंतर मजबुरीच्या नावाखाली आयुष्यातून निघून जायचं , मस्त जमत तुम्हा मुलींना….,
तुला विसरलो पण असतो ,पण  तू फक्त ….नाहीस ,अस्तित्व आहेस तू माझं ,आणि मी जर आयुश्यातुन तुला काढलं तर मी माझाच राहत नाही , तुला सोडून कस चालेल म्हणून तुला आयुष्यातून काढतं नाही ….
.
हे बघ मी कसेही स्टेटस ठेवतो म्हणजे खूप दुःखी आहे असं  नाही पण आठवणीत जगणं खरच खूप कठीण असत,
असो ,.
खूप खुश आहे तुझ्या आठवणीत, खरच सांगतोय आगदी हृद्ययापासून ,मस्त चाललंय सगळं आनंदात ,
जॉब पन करतो ,उरलेल्ल्या वेळात अभ्यास आणि त्यातून उरलेल्या वेळेत तुझी आठवण असते ना सोबत ,
तू साथ सोडलीस पण तुझ्या आठवणी आजही तुझी कमी पूर्ण करतात ,
कमीत कमी आठवणीत तरी राहा , कारण भलेही तू आठवणीत आहेस पण ,तू जवळ असल्याचा भास होतो तो याच आठवणींमुळे ,
शेवटी तुझ्याकडूनच तर  शिकलोय मी छोट्या छोट्या गोष्टींतुन आनंद मिळवन ,
आता हेच बघ ना मी इंटरनेट वर 2012 ला एका वेबसाईट वर एक प्रोग्रॅम केला होता, माझ्या दर वाढदिवसाला माझ्या मोबाईल वर रात्री msg येईल आणि मला कळेल की आज माझा वाढदिवस आहे म्हणून ,
मला तर ती वेबसाइट पण माहीत नाही आता, पण दर वाढदिवसाला रात्री 12 वाजता हा msg तेव्हा पासून येतोच ,पण झालय अस की मी  #from च्या समोर तुझं नाव टाकलेलं आहे,सहजच मला नव्हतं माहीत की पुढे चालून मला त्याचा असा फायदा होईल ,
आणि आज त्याच #msg मुळे मी अनुभवतो की तो #msg तूच पाठवलास, कारण #from मध्ये तुझं नाव आहे ,
.
thank you ,
#thanks या साठी की तू भलेही आज माझ्या पासून खूप दूर आहेस पण आठवणींच्या रुपात आजही तू माझ्या खूप जवळ  आहेस आणि तुझ्या याच आठवणींमुळे माझ आयुष्य खूप सुंदर आहे, बऱ्याच वेळेस भरकटतो मी कुठेही पण शेवटी तुझ्या कडेच यावं लागत ,
एक ऐकशील माझ्या आनंदासाठी.  तू खूप खुश राहा खूप ,,
तुझ्या आनंदासाठी मी नेहमी देवाकडे प्रार्थना करतो, आणि नेहमी करेल …
काळजी घे

मितवा ….❤️ ( २०१८ )

मित्रांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *