“गोडभेट”

" गोडभेट " ❤️

 
दोन दिवसांपूर्वी एका लग्नात गेलो होतो तिथे माझी एक बालमैत्रीण देखील आलेली होती.. मी लहान असताना त्यावेळेला मला ति आवडायची खूप; कारण काही नाही’ असच_ आवडायची म्हणजे आवडायची …👫
लहान असताना तिला खूप वेळा त्रास द्यायचो आणि विचारून विचारून परेशान करायचो
“ये मला तू आवडतेस_तुला मी आवडतो का ?? 😋 ए ऐकणा मला तू आवडतेस_ तुला मी आवडतो का ?? 😋😋
आणि होकार नकार अशी काही अपेक्ष्याचं नसायची, बस मनात आलं की बोलायचं एवढंच.; ..👍 आणि ती ही हसायची …😋 नाही म्हणायची..🤗;.आणि मग पळून जायची..🏃🏃
त्यानंतर आठवीमध्ये ती तिच्या मावशीकडे शिकायला गेली आणि नंतर आमची एकदाही भेट झाली नाही कधीच ,
मध्यंतरी तिचं लग्न झालं तिच्या भावाच्या मोबाइल मध्ये फोटो पाहिले होते आणि त्यांनतर आज कितीतरी वर्षांनी ती दिसली..👧🏻
.
ती काही अंतरावर महिलावर्गामध्ये बसलेली आणि मी अलीकडे तिथेच उभा होतो; 🕺
मी ओळखलं तिला लगेच आणि पाहिलं तिच्याकडे आणि तिनेही पाहिलं_ 💫 आमची नजरा नजर झाली आणि तिने सुद्धा ओळखला मला ,
मी तिला लांबूनच स्माईल दिली आणि तिनेही दिली …
खरंतर मला तिच्याशी तेव्हा खूप बोलावस वाटत होतं,
तू कुठे असतेस ?? कशी असतेस ??? अस विचारावस वाटत होतं ..💤
मी परत एकदा दुसरीकडे पाहत पाहत तिच्याकडे पाहिलं आणि ती, ती मात्र माझ्याकडेच पहात होती …एकदा परत मी smile दिली पण यावेळेला तिने स्माईल देता देता साडीत लपलेलं “मंगळसूत्र” काढून मुद्दामून मला दाखवत दाखवत वरती ठेवलं आणि तोंडावर हात लावून खाली मान घालून हसायला लागलेली…, 😂😂
मी मात्र गरीब बिचारा … 😒 काय करणार अश्या वेळेला’ हसत हसत दुसरीकडे नजर वळवली 😒
किती हा तिचा आगवपणा.. 💔
आता काय ठरवणार तिच्या अश्या कृतीला …म्हणजे अजूनही मला ती तो लहानपणीचा “सुऱ्या” च समजत होती; जो तिला त्रास द्यायचा आणि चिडवायचा…💆🤦 ठीक आहे काही हरकत नाही …😊😊
.
यावरून मात्र एक गोष्ट लक्ष्यात आली …👍
तुम्ही आयुष्यात कितीही मोठे व्हा’ कितीही चांगलं वागा ”
तरीही तुमच्या बाल मित्र मैत्रिणींसाठी तुम्ही मात्र लहानपणीचे ते खोडकर बाळच असणार आणि त्या तुम्हाला अजूनही कृष्णच समजत असणार ..
बोलायचं होत तिच्याशी पण नाही बोलणं झालं’ हरकत नाही_ प्रत्येक वेळी प्रत्येक व्यक्तीला भेटणं; बोलणं म्हणजेच “भेट” नाही🌷
असं लांबून तिच्याकडे पाहणं आणि एवढ्या वरश्यानन्तर आपल्याला ओळखून तिने #smile देणं`
.
ही पण एक “गोडभेटच” मनायची…👫
.
मितवा . ❤️
मित्रांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *