" प्रवाह "
_
सवय नसलेले ‘खरे’ होते मन माझे
मन माझें मात्र कुणाला कळले नाही
प्रेमाने भरलेले ‘हृदय’ होते माझें
चेहऱ्याच्या पलीकडे कुणी कधी
गेलेच नाही …
–
ज्याला जे पाहिजे त्याला ते देत गेलो
उशिराने कळले कुठेच मी नव्हतो
नव्हतोच मी कधी आयुष्यी कुणाच्या
आयुष्याला मात्र दोष मी देत गेलो । …
–
वाटली गरज तेव्हा ते जवळी आले
सम्पता गरज ते निघूनी ही गेले
नात्यामध्ये मी त्यांना शोधून पाही
परकेच ते; हे मी समजून गेलो ….
–
कळले मला किती पाण्यात मी
न माझे कुणी न कुणाचा मी
आयुष्याला ही शिकवण मी देत गेलो
हसलो ; रडलो पुढे मी निघालो ..।
–
समाजाची रीत मला ही कळाली
पाण्यात मी, थोडी दिशा मिळाली
दिशेकडे प्रवाह होऊन मी गेलो
_
प्रवाहात मी ‘जगणे’ शिकुनी गेलो
.
मितवा .. 🪶