" शेवटची भेट " 
आज कालची मूल किती लवकर प्रेम व्यक्त करून मोकळी होतात ना… म्हणजे ही प्रक्रिया जेवढी फास्ट होते तेवढीच होकार नकार मिळण्याची प्रक्रिया सुद्धा फास्ट होते, काही नाती जुळतात काही जुळत नाहीत जे जुळत नाहीत ते दुसरी कडे व्यस्त होऊन जातात . आठवण म्हणून तरी प्रेम शिल्लक राहत असेल का त्यांच्या मध्ये ? हे या साठी की आज तेरा वर्षांनी सुद्धा तिची आठवण मला तेवढ्याच प्रेमाने यावी …
नाही सांगता आल समोरा समोर कधीच की “तू मला आवडतेस, आणि खूप आवडतेस” दोन वेळा केलेला प्रयत्न, पहिल्या वेळी तर शब्द तोंडात अडखळले, हात थरथर कापत होते .. कुठे पाहतोय कळत नव्हत आणि काय बोलून निघून आलोय हे सुद्धा माहित नव्हत एवढं निरागस अस्त पाहिलं प्रेम …
परत कधी तसा प्रयत्न केलाच नाही , भेट व्हायची इकडच्या तिकडच्या गप्पा आणि परत आपला आपला मार्ग वेगळा,
मला काय बोलायचं आहे हे तिला कळाल असताना सुद्बा तिने दोन महिन्यांनी परत एक संधी ( हो संधीच ) दिली,
ती -“त्या दिवशी काय बोलायचं होत तुला “
मी म्हणलं ‘तुला माहित आहे ना … मग नको ना विचारू , जाऊदे काही नाही सोड तो विषय आणि तुला राग आला असेल तर सॉरी’.
ती – “अरे माझा होकारच आहे फक्त जे बोलास ते परत बोल. मला ऐकायचं आहे “
.
मी तिच्याकडे बघितलं, तिच्या डोळ्यात प्रेम दिसत असताना सुधा माझ्याच्याने नाहीच बोलणं झालं… माहित नाही का ?
पण मला रडायला आल आणि तिच्या समोर डोळ्यात पाणी आल माझ्या…
मनात काय चालू होत आणि त्या रडण्याचा अर्थ काय होता मलाच माहीत नाही …
त्याच्या आगदीच दोन दिवसांनी निरोप समारंभ झाला आणि आम्ही वेगळे झालो, परीक्षा केंद्रावर सोडायला तिचा भाऊ सोबत यायचा त्यामुळे नाही बोलता यायचं, परीक्षा झाल्या निकाल लागला. तीन महिन्या नंतर परत आमची भेट झालेली, तेव्हा सुद्धा बोलता आल नाही. निकाल पत्रक घेण्यासाठी तेव्हा तिच्या सोबत तिचे पप्पा आलेले शाळे मध्ये … मोजकच बोलणं झालं.
‘एडमिशन कुठे घेणार आहेस’ ? आणि ती म्हणाली “तू घेशील तिथेच; तुला सोडून कुठे जाणार” …
घरापासून पंधरा किलोमीटर वर असणाऱ्या एका महाविद्यालयात प्रवेश घेऊन तिच्या एका मैत्रिणी कडून तिला निरोप पाठवला,
फोन ची तशी सुविधा नव्हती त्या वेळी, त्यामुळे काही संपर्क नाही. महाविद्यालय नियमित चालू होत आणि त्यासाठी मी हॉस्टेल वर राहायला गेलेलो . तिच्या मैत्रिणी नियमित नाही यायच्या महिन्या पंधरा दिवसाला येकदा, एकदा झाली तिच्या मैत्रिणी ची भेट नी तिच्याविषयी चौकशी केली तर कळलं तिचं “#लग्न” झाल्याचं ..
.
माणूस मरताना त्याच्या डोळ्या समोरून आयुष्य ओझरत अस म्हणतात, माझ्या बाबतीत सुद्धा तेच झालं …
त्या दिवशी ती “तू बोल मला ऐकायचं आहे” अस म्हणाली आणि मी तिला नाही बोलू शकलो; बोलताना डोळ्यात पाणी आलं होत ती हीच भिती होती बहुतेक …”गमवण्याची भीती”
आणि तिचं भेट माझी प्रेमाची पहिली आणि शेवटची भेट ठरली.
त्याच दिवशी मी तिला कमवल आणि त्याच दिवशी गमवल.
.
@मितवा …
.
sscresult ssc2010 ,