प्रेमपत्र १

प्रेमपत्र – १

प्रेमपत्र - १ 🪶

मी कितीही  लपवण्याचा प्रयत्न केला ,
आणि मी कितीही कुणाला ओरडून सांगितलंना’ मी सिंगल आहे, तरी कुणी विश्वास नाही ठेवत ,का माहितेय ??
कदाचित..😊तुझं प्रेम #स्पष्ट दिसत माझ्या #चेहऱ्यावर ,,,
.
खूप प्रेम आहे ग तुझ्यावर बस मला ते शब्दात बरोबर सांगता येत नाही ,आणि का नसणार ?? एवढ्या मोठ्याययययय्या जगात, माझ्यासारख्या वेड्याला सांभाळून घेणारी तूच तर आहेस ,
हा जाणार आहेस सोडून ,म्हणून तर भांडण करतेयस कळतंय मला तस ,तसा राग पण आहे या गोष्टीचा खूप, पण काय करणार ,,भांडू नाही ना शकत तुला ,,
……किती सोप्प असत न तुम्हा मुलींसाठी- एखाद्याला #प्रेम द्यायच, प्रेम #शिकवायचं आणि #मजबुरीच्या नावाखाली नंतर निघून जायचं…
.
आम्हा मुलांना नाही जमत तस ,एकदा केलं ना एका मुलीवर प्रेम,, मग केलं ,,,विषय संपला ,,,,मग बाकी काही असो….
तू मला सोडून जातेयस मी तुला #भांडायच सोडून ,तू मला छोट्या छोट्या कारणावरून भांडतेयस ,कमाल आहे तुझी पण ,,,
सांग ना डायरेक्ट माझ्याशी बोलू नको म्हणून ,नाही बोलत,, पण अस भांडू नको ना..😒
किती लागतात तुझे #शब्द माझ्या #मनाला ,कळत का तुला,,
असा विचार येतो मनात की एवढं केलं या मुलींसाठी आनि आज ही नाती तोडायची भाष्या करतेय ,
एका थोड्याश्या चुकीबरोबर माझ्या सगळ्या प्रेमाची बरोबरी करतेय ,,,
आणि तूझ्या चूका तुला नाहीत दिसत ,उलट मी ज्या पोस्ट टाकल्या त्या त्याचसाठी होत्या ,अस पण तू मला बोलतच नाहीस मग थोडथोड मला तुझ्या आयुष्यातून काढतेस तर एकदाच काढ म्हणजे म्हणजे पोस्ट वाचून तुला वाटेल न, की किती खोटा आहे मी बोलत नाही तर लगेच दुसऱ्या मुलीच नाव टाकतोय आणि तुला राग येईल आणि तू आपला संपर्क कायमचा बंद करशील आणि वाचनाराला कळणार सुद्धा नाहीं की माझ्या आयुष्यात तू आहेस ,दुसऱ्या मुलीचं नाव टाकल्यामुळे तुला ही भविष्यात माझ्यामुळे काही अडचण होनार नाही ,,,
ही सगळी कारण होती तिच्या ( दुसऱ्या मुलीच्या ) नावाने पोस्ट टाकण्या मागे..
.
तुझ्या साठीच केलं होतं ना हे सगळं आणि या आदीही खूप काही केलेलं आहे जे तुला माहीत पण नाही आणि मलाही नांही अस सांगावस वाटत ,
कारण हे सगळं करून उपकार नव्हतो करत मी तुझ्यावर ,प्रेम होतं म्हणून केलं आणि आजही करतो…
पण तुला नाही कळणार ते ,
………….तुला तर मी आधीच म्हणालो ना ,तू मला कधीच नाहीस ओळखु शकणार ,,,
प्रत्येक गोष्ट मला शब्दात नाही सांगता येत ,भीती वाटते तुझ्याशी बोलण्याची कारण चुकून काही बोल्लो आणि तू गैरसमज करून घेतलास तर आणि अस पण तू आता माझ्या छोट्या छोट्या चूका काढतेय ,बहुतेक तुला भांडण करून आपलं नात संपुष्टात आणायचं आहे…,
.
जायचं असेल सोडून तर बिधास्त जा,मी काहीच म्हणार नाही पण काहीतरी बोलून किंवा मला त्रास देऊन  जाऊ नको ,भांडून जाऊ नको…
तुला एक सांगू,
तू खूप लकी आहेस तुला ती मिळाली  . …मला अस एक जण सुद्धा म्हणलं नाही ,
पण ती खूप लकी आहे जिला तू मिळालास ,
अस म्हणणारे खूप आहेत…
प्रेम केलंय तुझ्यावर जिवापेक्षा जास्त,अस छोट्या छोट्या चुकांसोबत त्याची बरोबरी नको करू ,,,
.
काय मागितलं मी तुला आजपर्यंत एका smile शिवाय ??
उलट ती #smile टिकून राहावी म्हणून तुझ्यापेक्शा जास्त तर मीच काळजी घेतली तुझी….👍

हे पहा आजही  माझं वैयक्तीक जीवन खूप छोटं आहे आणि त्यामध्ये तुझ्या आठवणींचं आभाळ खूप मोठं आहे आणि हे आभाळ जर काढलं तर या धरतीला प्रेमानं पांघरुन घालणार कुणीच नाही ,
ते स्थान आहे माझ्या आयुष्यात तुझं ‘तुझ्या आठवणींचं’ उद्या तू खरच सोडून गेलीस तर माझ्या सुख दुःखातल्या सोबती आहेत तुझ्या आठवणी ,म्हणून आज पर्यंत कधी जास्त भांडलो नाही प्रमाणातच ,
आज ना उद्या एकमेकांपासून दूर जायचय मग कश्याला भांडायच ,भलेही उद्या नाहीत आपण सोबत, पण सोबत असताना त्या गेलेल्या प्रत्येक क्षणाला खूप किंमत तर आहेच ना ,
.
तुला राग येण्यासाठी पोस्ट टाकल्या खऱ्या पण तिथं सुद्धा प्रत्येक पोस्ट खाली मी नमूद केलं खाली ,”ती माझी मैत्रीणच आहे” म्हणून ,
कारण मी खोट खोट सुद्धा प्रेम म्हणून माझ्या नावासमोर दुसऱ्या कुनाच नाव नाही लावू शकत ,
तुला सांगितलं ना एकदा कुणाच्या प्रेमात तर नाही पडणार मी आता ,
पण कदाचित  नंतर माझ्या एकटेपणाला कंटाळून मी कुनाला _
love you to ….जरी मनलं तरी ते फक्त शब्द असतील त्या सोबत त्या भावना कधीच नसतील ज्या तुझ्यासाठी माझ्या मनात आज आहेत …
विश्वास असू दे  ,
मी फक्त तुझा होतो आणि शेवट पर्यंत फक्त तुझाच राहील, ❤
.
काळजी घे – नकटे…

मित्रांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *