" हेच वय असत मित्रा " 
_
:
हेच वय असत मित्रा काहीतरी करण्याच ,
आभाळा एवढे स्वप्न सुद्धा जिद्दीने सत्यात उतरवण्याच ।
याच वयात बघायची असतात स्वप्न आपल्या ध्येयाची
याच वयात गाठायची असतात शिखर ती स्वप्नांची ।
अरे या वयात कुठे असते का ??
मन भरून विश्रांती
दिवस रात्र एक फक्त स्वप्नाकडे भ्रमंती ।
इतिहास फक्त वाचायचा नसतो मित्रा
त्यातून ही काही शिकायचं असत
नवा इतिहास घडवण्यासाठी आपन
आपल्या आतल्या बंधनाना भांडायच असत ।
उठ आणि लाग कामाला सोडून दे ते बंधनात अडकन
अरे किती दिवस तू भावनिक होऊन जगणार
सोडून दे ते तडफडन 
_
हरलास म्हणून खचू नको जिद्दीन उठून उभं रहा
दाही दिशा तुला साथ द्यायला तयार आहेत
फक्त तू कंम्बर कसून तयार रहा ।
येईल रे ती वेळ जेव्हा _
सगळे तुझा जय जयकार करतील 
माझाच भाऊ माझाच मित्र म्हणून डोक्यावर घेऊन तुला मिरवतील ‘ 
पण हे तेव्हाच घडेल मित्रा जेव्हा तू उठुन उभा राहशील
ध्येयाकडील वाटचाल जेव्हा तू @संयमाने
बळकट करशील
तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेव मित्रा
हीच वेळ आहे ती; तुझा जुना इतिहास बदलण्याची
जिद्दीने आणि सातत्याने स्वतःचा एक वेगळा आदर्श
निर्माण करण्याची ।
खूप साऱ्या प्रयत्नांन जेव्हा तू उंच शिखर गाठशील
तेव्हा मित्रा तू स्वत; स्वतावरच्या
अभिमानानं आयुष्य जगशील …
________________________
मितवा