" स्मृति " 🪶

” स्मृ । ती” ….💭
_
जाईल जेव्हा मी या जगातून
एक आठवण ठेऊन जाईल
लेखणीतून या प्रेम वाटण्या
एक पुस्तक बनूनी राहील
शब्द माझे भावना तुमच्या
एक वेगळीच ओळख राहील
जाईल जेव्हा मी या जगातून
एक आठवण बनुनी राहील .. 🎑
.
कधी माझे कधी तुमचे
प्रतिबिंब दिसतील ज्याचे त्याचे
कधी सुखाचे कधी दुःखाचे
पाझर फुटलीत या मनाचे
त्या मनाला ओळख देण्या
मी हसू बनुनी येईल ..
.
जाईल जेव्हा मी या जगातून
एक आठवण बनुनी राहील .. 🎑
.
कुणी हसावे कुणी रुसावे
ते पाहण्या मी नसावे
काही खरे तर काही खोटे
आठवणीत माझ्या हृदय रडावे
उतरविल ऐसें शब्द लेखणी
एक ओळख बनुनी राहील ,
.
जाईल जेव्हा मी या जगातून
एक आठवण बनुनी राहील ..🎑
_
मितवा ❤️
मित्रांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *