" ये तू परत एकदा " 🪶

 
ये तू परत एकदा पाऊस होऊन….
मी तयार आहे पुन्हा एकदा भिजायला..
मी तर या आधीही तुझाच होतो
आणि यावेळीही तयार आहे
पुन्हा एकदा तुझाच व्हायला .. 💓
ये तू कडाक्याची वीज बनून
मी तयार आहे तुझे आवेग सोसायला
माझी तर इथपर्यंत तयारी आहे
तुला आभाळापर्यंत गवसणी घालायला ..💕
ये तू परत एकदा सरी बनून ;
माझ्यावर मुक्त पणे कोसळायला..
माती बनून तुझी आतुरतेने वाट पाहतोय
परत एकदा तुला गच्च मिठी मारायला ..
.
>
मितवा ❤️
मित्रांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *