” गोष्ट एका मैत्रीची “

" गोष्ट एका मैत्रीची " 🪶

” मैत्रीप्रेम “
.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आपण कुणावर प्रेम केलं यापेक्षा जास्त महत्वाचं हेच असत की आपल्यावर कुणी प्रेम केलं; कारण आपण कुणावर प्रेम करणं याला भविष्यामध्ये नंबर मध्ये पकडल्या जात’
पहिलं प्रेम, दुसरं प्रेम आणि साहजिकच दुसरं प्रेम भारी असलं की पहिल्या प्रेमाच्या आठवणी मात्र धुसर होतातच पण याउलटआपल्यावर कुणी केलेल्या प्रेमाच्या आठवणी या कधीच धूसर होत नाहीत’ त्या कायम नव्या असतात- विशेष असतात आणि विशेष माणसांच्या असतात ,
ती माणसे आपल्या हृदयात आयुष्यभरासाठी कायमस्वरूपी जिवंत राहतात, कारण आपल्याला मिळालेली ती एक भेटवस्तू असते आणि प्रेमळ माणसांकडून मिळालेल्या प्रेमाच्या भेटवस्तू आपण कधीच विसरत नाही… असच काहीच म्हणा ..💓
.
शेवटी तुटलेलंच हृदय माझं आणि त्यावर पुन्हा एकदा नव्याने आणि खऱ्या प्रेमाची फुंकर घालणारी माझ्या आयुष्यातील एक गोड व्यक्ती होती ती आणि आजही आहे….🍃
प्रेमावरून माझा विश्वास उडालेला असताना देखिल माझ्या हातात मैत्रीचं गिटार देऊन पुन्हा एकदा त्यातुन प्रेमाचाच झंकार प्रेमाने काढणारी “तुला प्रेमाने हरवलं असलं तरी हे विसरू नको; तुझी मैत्री अजूनही जिवंत आहे आणि तीच मैत्री तुला पुन्हा एकदा प्रेम शिकवेल” अस मनापासून म्हनणारी आणि मैत्रीच्या प्लॅटफॉर्म वर प्रेमाचं गणित पुन्हा एकदा; नव्याने शिकवणारी’ माझी जिवलग मैत्रीण
😘 ” शुभी “
तस तीच नाव ‘शुभांगी’ पण जवळच्या माणसाला नावाने नाही तर प्रेमाने हाक मारायची असते म्हणून ‘शुभी’च ठीक….💐
तशी आमची चार पाच महिन्यांंची सोबत होती पण त्यातील तिच्यासोबतचा प्रत्येक क्षण मात्र खूप साऱ्या आठवणीने सजलेला आणि म्हणून तर अडचण आहे एवढ्या साऱ्या आठवनी शब्दात मांडणार तरी कश्या ,
आणि काही गोष्टी अश्या शब्दात मांडता येत नाहीत आणि काही आठवणी तर अश्या असतात की त्यांना मांडायला शब्दच मिळत नाहीत …आणि ज्या आठवणींना मांडण्यासाठी शब्द मिळत नाहीत तिथे मिळते आसवांची सोबत आणि आसवांसोबत मैत्री करून लिहीन मला तरी आता शक्य नाही, आणि अस हि` लिखाण हे दुसऱ्याच्या डोळ्यातून पाणी काढणार असावं….आपल्या डोळ्यातून पाणी येण्यासाठी तर त्या व्यक्तीच्या हजारो आठवणींमधील एक आठवनच पुरेशी असते …🌃
खूप कमी दिवसातील आयुष्यभर पुरतील असे ऋणानुबंध आणि ते एवढे खोल की तिला बोलताना कधी विचार करावा लागला नाही आणि जेव्हा काही बोलता आलं नाही तेव्हा तिने समजून घेतल्या शिवाय राहिली ही नाही …🌷
.
माणसाला जगण्यासाठी प्रेम हवं असत अस खरच काही नस्त ओ’ मुळात माणूस हा प्रेमाच्या शोधात कधी नसतोच` त्याला तर फक्त आपल्याला समजून घेणारी व्यक्ती हवी असते; बाकी प्रेम करायला तर तो स्वतःही समर्थ असतोच की आणि त्यावेळेला अशी व्यक्ती भेटली की कुठे ठेऊ: कुठे नको_ असं होतं ,
आणि असंच व्हायचं मला जेव्हा ती जवळ होती’
माझ्यासाठी माझ्या आयुष्यातील एक गोड पर्वणी च होती ती’
~मी तिचा शिवम सारंग आणि ती माझी ‘आवणी’ मैत्रीच्या खूप खूप पुढे आणि प्रेमाच्या फक्त थोडंस अलीकडे;
असच काही..💓
_
जेव्हा ती होती तेव्हा तिच्याशी बोलायचो आज ती नाही तर स्वतःशी बोलतो पण विषय मात्र शेवटी ‘ती’च ..
आजही तिची एक एक आठवण माझ्या चेहऱ्यावर हास्य खुलवते आणि तिच्या आठवणीत हसायला आलं की ती जवळ असल्यासारखी भासते ….मैत्री हे नाव ऐकलं तरी तीच आठवते आणि प्रेम नाव ऐकलं तरी तीच ,
कारण एकच_
‘मला प्रेमानं आयुष्यात हरवलं होत आणि मैत्रीने त्याच हरलेल्या आयुष्यातून सावरलं होत.. प्रेमान प्रेमावरचाच विश्वास उडवला होता पण मैत्रीने प्रेम करून प्रेमावरचा विश्वास टिकवला होता ‘
तेव्हा खरोखर कळाल ,
एकवेळ प्रेम म्हणजे प्रेम नाही पण मैत्री म्हणजेच खरोखरच प्रेम आणि हे प्रेम मी फक्त केलं नाही तर मनोमन हेच प्रेम मी जगलो तिच्यामध्ये आणि “प्रेम” म्हणजे काय हे मी तेव्हा अनुभवलं_
.
तिच्या सोबत… तिच्या मैत्री मध्ये ..👫
मितवा ❤️
मित्रांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *