शेवटची भेट ...
ती दिवाळी निमित्ताने गावाकडे आलेली होती ,
आहे एक खूप मोठं कारण ज्यामुळे आम्ही एकमेकांपासून खूप दूर झालो ,
दिवाळीला ती येणार नाही असं ऐकलं होतं मी तिच्या घरच्यांकडून आणि अचानक मला दुपारी ती घरासमोरून जाताना दिसली ,
इतक्या दिवसानंतर सुद्धा मी तिला लगेच ओळखलं ,
तिला कस विसरेल सगळ्यात छान बालमैत्रिन होती ती माझी ..😊
(आजही आहे …😭)
6 वर्ष झाले मी तिला पाहीलही नव्हत आणि काल आमची भेट झाली , तिला भेटायला जायच्या आधी मी 30 मिनिट तयार होऊन उभा होतो ,भीत होतो तिला बोलायला ,
खूप भित्रा आहे मी तिच्या बाबतीत, लहान असताना सुद्धा तिला बोलायला भ्यायचो आणि आता पण भितो ,तरी खूप हिम्मत करून तिच्या घरी भेटायला गेलो, ती पाय धुत होती पाहिलंं तिला आनी जाग्यावर स्तब्ध झालो ,
कितीतरी दिवसा नंतर पाहत होतो मी तिला ,
तिने ही पाहिलं आणि ती अस सहज बोलून गेली, कसा आहेस किती दिवसानंतर भेटतोयस ,
येणं आत ,बाहेर का उभा आहेस?
माझ्या हृदयाची स्पंदन वाढलेली होती आणि घाम पण आलेला आणि ती अशी अचानक बोल्ली ,
खर सांगायचं तर मी गैरसमजकरून घेतला होता की ती आता मला विसरली असेल पण अस काहीच नव्हतं ,
तिथंच डोळ्यात पाणी आलं माझ्या आणि तिने ते ओळखलं ,
तुला एवढं मुली सारखा लाजायला नेमकं होत काय सांग ना ? लहान नाहीस तू आता …
मी मात्र शांत, तिनेच केली सुरवात बोलायला जाऊदे ,कुठंयस काय ,काय करतोस ,आणि आता कविता करतोस की नाही ….
बोल्लो भीत भीत तसा,
तिच्या नजरेला नजर सुद्धा मिळवू शकत नव्हतो मी,
एकाद्या गुन्हेगारासारखा तिच्या समोर बसलेला मी आणि आणि मला घाबरलेला बघून हसत होती ती ,
खूप वेळ बोलत बसलो आम्ही, कितीतरी दिवसा नंतर भेटलो होतो अधून मधून लहानपणीच्या आठवणी मी काढल्या की ती शांत व्हायची आणि मी ही शांत बसायचो नेमकं ती अस का करायची कळत नव्हतं म्हणून मीच म्हणालो तुला लहानपनीच काहीच आठवत नसेल ना, बिझी झालीस खूप ..
आणि ती “हो” म्हणाली ,
ती का अस म्हणली माहीत आहे मला, मला खूप वाईट वाटलं,
पण हसलो तरी पण ,कारण जेव्हा तिची माझ्याशी बोलीण्याची खूप इचछा होती तेव्हा मी तिला कधीच नाही बोल्लो ,तिला टाळायचो मी, पण ती कधीच रागावली नाही ,
दर वेळेस तिनेच समजून घेतलं मला ,
मी तरी काय बोलणार, कस बोलणार एकतर तेव्हा मी खूप लहान होतो आणि माझ्याकडे तिला बोलण्यासाठी शब्द नव्हते ..
आज शब्द आहेत पण वेळ निघून गेलीयेय ,
कुणीतरी खरच म्हणलेलं आहे ,जेव्हा आणि ज्या क्षणी तुम्हाला जे करावं वाटेल जे बोलाव वाटेल ते बोला ते करा ,कारण गेलेली वेळ कधीच परत येत नाही …
रडायला येत होतं मला , तरी आवरत होतो स्वतः ला, माझ्या डोळ्यातील अश्रू प्रामाणिक होते पण भूतकाळ परत आण्याची ताकत त्यांच्यात नव्हती म्हणून थांबत होतो ..
तिला बोलत असताना मनावरचं खूप ओझं कमी होत होत,
आठवणींच्या वेदना ह्रदयाला चिरत होत्या,अश्रू आवरेनासे झाले होते आणि मनात एक खूप मोठ वादळ जन्म घेतय असच वाटत होत.. वेळीच स्वत;ला आवरायला हव अश्या वेळी,,,
बोलायला काही विषयच सापडत नव्हता मला म्हणून
मित्राचां कॉल आला अस सांगून निघालोच होतो आणि ती म्हणाली ~
-खूप मैत्रिणी असतील ना आता तुझ्या आणि मी म्हणालो ,आहेत’
पण तुझी बरोबरी करणारी एकही नाही ,
तुला एक सांगू ,,”असा एकही दिवस नाही की तुझी आठवण आली नाही. कारण तुझी आठवण काढायला मी तुला विसरलोच नाही, तुला विसरायला तू काही स्वप्न नाहीस जिवंत अस्तित्व आहेस तू माझं आणि आपल्या अस्तित्वाला कुणीच विसरत नाही”,
.
.
मला माहित नाही तिला बघितल्यावर मी असा शांत का होतो तर,
मला माहित नाही तिला बोलताना हृदयाची धडधड का वाढते ,,
मला माहित नाही आमच्यात प्रेम आहे की मैत्री ,
काहीच माहीत नाही आणि त्याची गरज पण नाही ,
मला फक्त एवढं माहीत आहे जेव्हा मी by केलं तेव्हा तिच्या डोळ्यात सुद्धा पाणी आलं,
तिने ते लपवल आणि मी ते टिपलं ,
.
डोळ्यात साठवून घेतलं तिला मी शेवटच ,कारण माहीत नाही ,
फक्त एवढं माहीत आहे की आता आमची परत भेट होणार नाही …
.
मितवा ….❤️ ( २०१६ )