महाविद्यालयीन आयुष्यातील आठवणी

माझी महाविद्यालयीन आयुष्यातील एक गोड आठवण . ( 2014 )
.
आज सहज माझ्या महाविद्यालयाकडे एक चक्कर मारली गावापासून तस जवळ आहे म्हणून आलो सहज जाऊन ,
तिथे महाविद्यालयाच्या डाव्या बाजूला महादेव मंदिरापाशी तेव्हा मी वाणिज्य त्रितीय वर्ष्यात असताना एक जनरल स्टोर होत आणि त्या स्टोर ची एक आठवण आहे म्हणून मुद्दामून तिकडून एक चक्कर मारली ,
.
______मी वाणिज्य तृतीय वर्ष्यात असताना महाविद्यालयाच्या डाव्या बाजूला एक महादेव मंदिर आहे तिथे एक जनरल स्टोर होत , ते नवीन होत त्या वेळेला, सगळे जण तिथेच झेरॉक्स मारायचे आणि मी जरा जास्तच मारायचो कारण पुस्तक विकत घेण्याइतके त्यावेळेला माज्याजवळ पैसे नसायचे त्यामुळे मी पुस्तकाची आणि नोट्स ची झेरॉक्सच मारून घायचो आणि त्या ठिकाणी 50 पैस्यांना झेरॉक्स मिळायची आणि दुसरीकडे दोन रुपयांना,
नंतर काही दिवसांनी झालं असं की माझा महाविद्यालयीन मित्र आकाश जाधव याने पण माझ्या रूम शेजारीच रूम केली म्हणून मला त्याची आणि राजू ची पुस्तक वाचायला मिळायची , त्याच्या नोट्स वगैरे द्यायचे मला ते वाचायला त्यामुळे नंतर मी तिथे गेलोच नाही आणि असच एके दिवशी मी तिथे झेरॉक्स काढायला गेलो तेव्हा तिथं जी मुलगी होती तिने मला नाव विचारलं आणि मी सांगितलं “सुरेश” , (नंतर बरच झालं तस सर्वसाधरण बोलणं आणि बरच काही कळाल तिच्याविषयी की हे दुकान तीच नाही तर तिच्या काकांच आहे आणि ति आहे काहीदिवसांसाठी, तशी आमची तोंडओळख अगोदर झालेली होतीच रोजच्या व्यवहारामुळे म्हणून झालं बोलणं, )
.
नंतर बऱ्याच वेळेस माझं झालं तस जाण तिथे ,
एके दिवशी मला एक एक पु.ल देशपांडे यांचं एक नाटक माझ्या वाचनात आल आणि मला ते आवडलं म्हणून मी झेरॉक्स मारण्यासाठी गेलो तिथे, तिने दिल्या झेरॉक्स मारून पण तिने पान ठेऊन घेतली आणि मनाली माज्याकडे राहूदे हे पान, मला वाचायचं आहे मी तुला उद्या करते परत ___
आणि नंतर मात्र अस प्रत्येक वेळेला व्हायला लागलं, नेमक जे मी झेरॉक्स मारेल ते ती वाचण्यासाठी ठेऊन घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी मी परत घेऊन जायचो, अस बरेच दिवस चाललं, पण माझ्या काही लक्ष्यात नाही आलं ,
.
नंतर काही दिवसांनी माझ्या 6 व्या सेम परीक्षा झालेल्या होत्या आणि मला गावाकडे जायचं होतं आणि माझं एक पुस्तक राहील होत तिच्याकडे ,
गेलो तेव्हा तिथे एका मुलाने झेरॉक्स मारलेल्या होत्या आणि त्याच्याकडून तिने दोन ला एक झेरॉक्स अशे पैसे घेतले ,
मी विचारलं झेरॉक्स तर 50 पैस्याला आहे न वाटत,
मग तिने सांगितलं नाही झेरॉक्स दोन लाच आहे पण तू नेहमी नेतो म्हणून तुला कमी पैसयात देते ,
तर मी विचारलंच_ म्हणजे सूट फक्त मलाच आहे तर ,
ती म्हणाली हो मग तू नेहमी मारतो ना म्हनून तुला डिस्काउंट देते ( नेमका तेव्हा मला संशय आलाच होता आणि नंतर …..)
.
बर ठीक आहे ,आज संपल माझं कॉलेज, आज शेवटचा पेपर होता माझा , आज गावाकडे जातोय, ते पुस्तक दे ना माझं ,
ती- हो महितीयेय झाले तुझे पेपर म्हणून ? जातोयस का गावाकडे मग परत कधी ,??
मी- आता नाही आता डायरेक्ट दाखला न्यायला येईल नंतर पुढे नांदेड नाहीतर मग पुण्याला जाईल ,
ती- ओके येणं थोड्या वेळाने, माझं थोडं राहील आहे वाचायचं ,वाचन झालं की लगेच देते ,
आणि मी राजू नीलकंठ माझा मित्र याच्या घराकडे जाऊन आलो आणि नंतर तिने पुस्तक दिल आणि मी घेऊन गेलो ,
गावाकडची बस सायंकाळी पाच वाजता होती  म्हणून दुपारी आकाश जाधव, मी ,,,उमेश लिंगायत आणि झरी चा एक मित्र होता सत्वधर म्हणून आम्ही गप्पा मारत बसलो आणि सहज बोलत बोलत मी हातात पुस्तक घेतल आणि चाळल तर एका पानावर – ( बरेच काही प्रेमाचे शब्द लिहिलेले होते , ) अस लिहिलेल होत आणि मी ते वाचलं , पण म्हणलं नेमकं हिने लिहिलं आहे की मित्राने कुणी आधीच लिहिलेलं असायचं कारण त्यावर लिहिणारच नाव नव्हतं , बर हिला विचारून पाहू जर हिने नसेल लिहिलेलं तर उगाच काय ….
जवळच होती तिथे रूम माझी कोळेकर यांच्या इथे आणि तिथून तीच दुकान जवळच होत म्हणून त्यांना थांबा म्हणलं’ आलोच, आणि सायकल काढली आणि तिला विचारायला जातच होतो तर वाटेतच सायकल वर #येताना मला ती दिसली , समोर आली की तिच्या हातात पुस्तक दील आणि मनालो ,तुला तर खूप छान लिहिता येत, हे तूच लिहिलंयस का ??
किती छान लिहिलं आहेस खर …,,आणि समोर बोलायला भीती वाटते का ?
आणि ती – नाही तस नाहीं पण (लाजली थोडी )
…..मला माहित होतं तू वाचल्या नंतर परत येशील ,
म्हणून मी शॉप बंद करून तुझी वाट पाहतच होते आणि तू येताने दिसला म्हणून ईकडेच आले ,
बोल ना काय झालं …☺️☺️☺️
.
( ती थोडं गालात हसत होती मी पाहिलं आणि नेमका तेव्हा तिची मजा घेण्याचा माझा मूड झाला )
.
मी – ( थोडं शांत बसून एकदम गंभीर स्वरूपात तीच्याकडे पाहत … )
काय समजतेस काय स्वताला, उगाच किती दिवसा पासून पाहतोय माझी पुस्तक काय ठेऊन घेतेय; झेरॉक्स मध्ये काय सूट देतेत, तुला काय वाटलं मला कळत नाही हे, मूर्ख दिसतो का तुला मी? परीक्षा चालू होत्या म्हणून शांत बसलो होतो ,,, तू लिहिलसच कस काय हे,, तू समजलस काय मला नेमकं सांग ….( ती एकदम शांत माझ्याकडे बघत , सॉरी म्हणायला सुद्धा घाबरत होती आणि मी अजून घाबरवत होतो )
मी -तू हे लिहिलंस कस काय सांग, ( तिनें शेवटच एक क्षण माझ्याकडे पाहिलं आणि ते पुस्तकाच पान फाडून टाकलं )
अरे बापरे – मला मात्र खरोखर तेव्हा खूप खूप राग आला तिच्या या कृतीचा,
.
ये वेडी आहेस का तू ( मी पुस्तक हिसकावून घेतलं )
आणि तेव्हा ती थोडं रडायला लागलेली …..
लगेच सायकल घेऊन ती चालायला लागली , आणि मी पाठीमागून हासत तीची समजूत काढत ,
“ये मजाक करत होतो सॉरी,अरे खरच मजाक करत होतो सॉरी प्लीज ….”
पण तिने शेवट पर्यंत एक शब्द बोलली नाही , मी सॉरी म्हणत होतो तिची समजुत काढत होतो, आणि ती मात्र दुसरीकडेच पाहत चालत होती …..डोळ्यातील पाण्यानी तिचे डोळे काठोकाठ भरलेले होते ,
( मला कळून चुकलं माझं जरा जास्तच झालं वाटत , म्हणून मी परत निघालो , थोडा वेळ गेला की होईल म्हणलं ठीक ….)
मी निघालो ok सॉरी आणि मी खरच मजाक करत होतो ,
( ती मात्र आणखी ही डोळ्यातून पाणी आवरायचं प्रयनतात असफल होत होती ……रडत होती दुसरीकडे पाहून , कदाचित तीच पाहिलं प्रेमच मी होतो ,कारण मानूस सगळ्यात जास्त पहिल्या प्रेमात रडतो ,अनुभव नाहीच तसा’ पण माहीत आहे, खरोखर ती माझ्या प्रेमात म्हणा किंवा आकर्षणात’ पण होती मात्र शंभर टक्के , मला ते दिसत होतं तिच्या डोळ्यात आणखी काय, आणि मी चालताने वळून वळून तिला पाहत होतो पण तिने मात्र नाही पाहिलं आणि शेवट पर्यंत माझ्याकडे नाहीच पाहिलं आणि तशीच सायकल वर पुढे गेली )
.
मी निघून आलो परत तिकडे गेलोच नाही आणि त्यावेळेला सुट्या लागलेल्या , कॉलेज चालु झाल्यानंतर मी टीसी काढण्यासाठी गेलो तेव्हा आवर्जून तिच्या दुकानावर गेलो पण तिथे नव्हती ती, तिचे काकाच होते, नंतर पण खूप वेळेला तिथे गेलो पण ती नाही दिसली , आणि तिच्या काकांना तरी कस विचारणार ,
.
नंतर इकडे आलो पुण्याला शिकायला आणि मी नंतर अभ्यासाला लागलो तर विसरलोच होतो पण नंतर जेव्हा गावाकडे गेलो तेव्हा मला ते पु.ल देशपांडेंच्या नाटकाची झेरॉक्स मारलेली पान एका जुन्या पुस्तकात मिळाली, आणून तशीच ठेवलेली होती पहिलीच नव्हती मिळाली दुपारी वाचत बसलेलो आणि मध्ये वरती एका पानावर “कॉल मी आणि मोबाईल नंबर” लिहिलेला होता , कुणी लिहिलं असेल आणि माझ्या मनात पण नाही ,
सहज कॉल केला , तर तिनेच रेसिव्ह केला ,,
ती – hallo कोण ?
मी- आपण कोण ,इथे माझ्या zerox page वर कॉल मी नाव आणि नंबर होता म्हणून केला कॉल …
ती-अस का , बर बोल ….
मी-कोण आपण … ( आणि तिने तीच नाव सांगितलं आणि थांबली , मी ओळखलं लगेच आणि खूप खूप बोलली पुढे_ सगळं पाठीमागच सांगितलं , वेळ जाऊ दिला म्हणून ती स्थिर झाली होती आणि या वेळेला शांत होऊन बोलत होती ,सांगत होती तू परत येशील म्हजून मी वाट पाहिली तुझी -मला वाटलं होतं तू येशील पण नाहीस आला _त्या दिवशी रात्री दहा पर्यंत शॉप चालू ठेवला होता , शेवटी काका आले मला न्यायला पण तू आलाच नाहीस , आणि मी नंतर इकडे मावशीकडे आले इकडेच आहे आता , बोलत होती न थांबता आणि मी पण नाही थांबवलं तासभर बोलत बसलो आम्ही , नंतर … अरे हा आईचा नंबर आहे माझ्याकडे मोबाईल नव्हता तेव्हा आणि तुझा पण नंबर नव्हता ना माझ्याकडे आता मी मावशी कडेच आहे शिकायला,
__ आई आलेली आहे सद्या इकडे पण आता आई आणि मावशी बाहेर गेलेली आहेत आणि बायचान्स मोबाईल घरी आहे आणि मी कॉल रेसिव्ह केलाय नशीबच आणखी काय ,किती मिस करतेय तुला मी आणि इतक्या दिवसा नंतर आज कॉल केलास असो पण आजचा दिवस खूप छान आहे…, –
(___तुरळक मी बोलत होतो बाकी तीच बोलत होती आणि मी ऐकत होतो ,खूप खुश होती ती -; ,)
ऐकणा मी तुला माझ्या नंबर वरून msg करते save कर माझा no :;
.
मी- नाही नको राहूदे , save नको करू उलट आता जो आपला कॉल झाला तो पहिला आणि शेवटचा, नंबर डिलीट कर माझा,
बस राहूदे आठवणीत असच ….
( आणि मी लगेच कॉल कट केला, मी खुश होतो फक्त परत एकदा भेट झाली आणि तिला आनंदी पाहिलं म्हणून , तिला बोलणं आवरलं मुद्दामून, का ते माहीत नाही ,,, )
तिचे कॉल msg आले नंतर पन मी नंतर मग मुद्दामून माझा नंबरच बदली केला,
.
मी कसा आहे माझं मलाच माहीत नाही ,, माझ्या वर कुणीतरी प्रेम करावं म्हणून तरसतो आणि जेव्हा खरोखर मनापासून प्रेम करणार मिळालं तेव्हा मला ते नको होत, का नको होत याच उत्तर आजही नाही माज्याकडे ,
.
आज गेलो होतो महाविद्यालयाकडे तर मुद्दामून तिकडे चक्कर मारली म्हणलं तिचे काका भेटले तर ठीकच ,काकानाच विचारू कशी आहे ती तर ,
पण तिथे आता एक किराणा दुकान झालेल आहे आणि त्यांना विचारलं इथले जनरल स्टोर वाले कुठे गेले तर त्यांना पण माहीत नाहीं ,
ती कुठे आहे _कशी आहे मला आता काहीच माहीत नाही ….💔
.
ही माझ्या #महाविद्यालयातील सगळ्या आठवणीतील सगळ्यात छान आठवण आहे जी मी आयुष्यात कधीच विसरणार नाही …..☺️
.
मितवा .
मित्रांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *