" बापमानुस "
घर माझं कोसळत होत
तेव्हा बापच होता आधार
कष्टान नवं घर त्यानं उभं केलं
स्वतःच्या जीवावर होऊन उधार
–
मी पाहिलं ओ डोळ्यांनी
माझ्यासमोर कित्येकदा
त्यांन स्वता:च सुख गहाण ठेवल
माझ्यासाठी अनेकदा
–
त्यो स्व:ता रायला उपाशी
मला भूक नाय म्हणून
दोन घास आमच्या पोटात जाऊ दिले
रात्र उपाशी जाऊ न्हाय म्हणून
–
स्व:ता अर्ध्या कापडावर जगला
आम्हाला पूर्ण कापड मिळावं म्हणून
रात्रण दिस कामातच रायला
आम्ही शिकून मोठ सायब व्हावं म्हणून
–
अभिमान वाटतो नेहमी
मला माझा ह्यो #बाप म्हणून
स्वतः नाय जगला कधी
आम्हाला जगाय मिळाव म्हणून ।
_
कधी अस बापाकड बघून
डोळ्यात माझ्या पाणी येत
मारावी एक गोड मिठी
अस माझा मनी येत
–
पण डोळ्यात माझ्या पाणी बघून
त्याला मी हरल्याची जाणीव होईल
माझ्या काळजीनं माझ्यापेक्षा
त्योच जास्त खचून जाईल
–
कष्ट करून कधी कधी
नशीब नाय ओ देत साथ
रात्र दिवस एक करून पण
होतो जेव्हा स्वप्नांचा आघात ;
–
गुडग्यावर बसतो तेव्हा
मी जेव्हा जातो पुर्ण हरून
कळत त्याला हारलोय मी
तेव्हा येतो तोच गहिवरून
–
जवळ घेऊन तेव्हा मला
माझा #बापच देतो आधार
आर सुरवात हाय लेका ही
एवढ्यात घेऊ नको मागार
–
मोठं सायब व्हायचंय तुला
फक्त तू खचून जाऊ नको
आर हाय की मी तुझ्या सोबत
पोरा हार मानू नको ।
–
बापाचा त्यो प्रेमळ हात जेव्हा
असा माझ्या पाठीवर पडतो
बापाला मिठी मारून तेव्हा
मी रडत रडत हसतो
–
हरलेला मी हि तेव्हा
नव्याउमेदिन उठतो ..
उठून पुन्हा नव्या दमान
आयुष्याकड मी वळतो ..
.
>
मितवा 🪶