" बाप-माणूस "
नेमका दहावीचा निकाल लागलेला त्या दिवशी ; वर्गातील आडोतीस विद्यार्थ्यानमध्ये काही जेमतेम विद्यार्थी पास झाली होती आणि त्यात माझा नंबर_ त्यामुळे जास्त खुश होतो. सायंकाळच्या वेळेला दादा ( वडील ) तालुक्यावरून आले सोबत पेढे होते` मी सगळ्या गल्लीत वाटून परत घरी आलो तर पाहतोय तर टेबल वर एक मोबाईल ठेवलेला: साहजिक आहे तो माझ्यासाठीच होता
‘ पोरग अपेक्षा नसताना पास झालय म्हणूनच ‘..
मी घेतला नी गावभर दाखवत फिरत होतो. . मध्यमवर्गीय कुटुंबात पास झाल्यावर पेढे मिळनच खूप कौतुक असत त्यात एखादी वस्तू मिळणं आणि 2009 – 10 च्या काळात घरच्यांकडून मोबाईल मिळण म्हणजे आर र र र..
.
फिरून फिरून घरी गेलो; घरात पाऊल ठेवलं नी बापमानुस समोर उभा. कडकडून मिठी मारली नी बोलोच नाही काहीजास्त जेमतेम दोन तीन शब्द बोलो असेल कारण रडायला आल होत.
ते सुद्धा काही जास्त बोलले नाही
“आवडला ना तुला ?? बस मग काय .. चल जेवायला ..
मी नाय जेवलो त्या दिवशी जास्त _ पोट भरलं होत माझं मोबाईल बघून ..
.
दुसऱ्या दिवशी दादा शेतामध्ये गेले तेव्हा आई कडून कळाल की कुणी तरी त्यांना पैसे दिले होते की तालुक्यावरून येताना आम्हाला एक मोबाईल घेऊन या आणि तो मोबाईल तो होता
जो माझ्या हातात होता ..
आई ला विचारलं ‘मग म्हणायचं ना मला; संगायच तस ‘
पण आई म्हणाली “तू खूप खुश होतास म्हणून ते काही बोले नाहीत: जाऊदे म्हणले दुसरे पैसे देऊ आपण त्यांना ज्यांनी दिले होते”
मला दिवस भर करमत नव्हत खूप खूप वाईट वाटत होत की माझ्यामुळे त्यांना आता पैसे द्यावे लागणार .रात्री दादा घरी येई पर्यंत मी घरीच थांबून_ ते आल्यावर मी माफी मागून मोबाईल परत केला;
मला माहित नव्हत म्हणलं. पण त्यांनी नाहीच ऐकल-
“राहुदे बाळा ऐक माझं राहुदे ” अस म्हणून शेवटी मलाच दिला ‘त्यांना दिले मी दुसरे पैसे’ अस म्हणून त्यांनी विषय बदल्ला ..
.
तो माझा पहिला मोबाईल होता , तो मोबाईल घेऊन मी सगळ्या कॉलेजात शायनिंग मारत फिरायचो ; सगळ्यांना वाटायचं मी खूप श्रीमंत आहे पण मी खरा गरीबच:
“माझा बाप श्रीमंत मनाचा माणूस” .. ..
–
माझ्यावर भरपूर प्रेम करणारा माझा बाप आणि त्या बापानी माझ्यासाठी: माझ्या आनंदासाठी केलेले त्याग हे माझ्या आयुष्याचं आभाळ आहेत आणि त्यामुळे मी कितिजरी मोठा झालो तरी आभाळाच्या खालीच असणार ..
.
I miss u papa .. i love you so much ..
.
मितवा 🪶