" प्रेरणा "
आहे खूप दुःख
पण सांगणार कुना कुणाला
कोण कुठपर्यंत साथ देत
विचारा एकदा मनाला
तुम्हाला अस वाटत का
कुनी दुःख तुमंच वाटून घेईल ??
सुखाचे भागीदार असतात साहेब
दुःखात कोण भागीदार होईल ..?
कुठपर्यंत राहणार तुम्ही:
अस दुसऱ्यावर अवलंबून
आहेत का तुम्हीच तुमच्या सोबत
बघा एकदा स्वतःमध्ये डोकावून
जर नसाल तुम्हीच तुमचे
तर तुमचा कुणी कसा होईल ;
होईल जरी तुमचा तरी
तो तुमची साथ का देईल ??
–
आहेत खूप अडचणी
सांगणार कुणा कुणाला
लोक सल्ले देतात साथ नाही
माहीत आहे न स्वताला ??
मग माहीत असूनही साहेब
का तूम्ही कनखर होत नाहीत
पर्याय शोधून नवा कोरा
का तुम्ही पुढे जात नाहीत ??
बंद करा हो अस
दुसऱ्याला प्रत्येकवेळी गृहीत धरण
स्वतःच्या आनंदी आयुष्याला
दुसऱ्याला कारण बनवणं
असा प्रत्येक क्षण
दुसऱ्याच्या नावावर केला
की
आपणच आपलेच राहत नाही
सुख आपलं दुःख आपलं
पण तेही आपल्याला
निट उपभोगता येत नाही ..
.
मितवा ❤️