" प्रेम म्हणजे समर्पण. " ❤️
पुण्यात नवीन आलो तेव्हा काही दिवस कामच मिळालं नव्हत, मित्रांकडून काही उसने पैसे घेतले ते पण संपले तेव्हा घरी कॉल करून आईला व्यथा सांगितल्या आणि आईने “बर कुणाला सांगून पाठवते. काही आहेत माझ्याजवळ” अस म्हणाली आणि शेजारच्या ऐका मुलाच्या मोबाईल वरून पाठवले सुद्धा. मग पैसे आले की “हो आले आई पैसे” एवढंच बोलण झाल.
त्या नंतर काही दिवसांनी आई ला बोलताना म्हणालो
‘आई एवढे पैसे तुमच्याकडेच होते की कुणाकडून उसने घेतले होते ? नाही म्हंजे कुणा कढूण घेतले असतील तर सांग मी त्यांना परत देतो आता माझ्याकडे आले आहेत’.
तर आई म्हणाल्या “किती होते, 2 हजार तर पाठवले होते ना, होते माझ्याकडे तेवढे”…
आणि मी म्हणालो नाही तर, मला तर 12 हजार पाठवले सोम्या न… मग आई परत म्हणाल्या “अरे देवा_ नाही रे मी तर दोनच हजार दिले होते चुकून पाठवले का काय त्यानं त्यालाच विचार”
त्याला कॉल केला तर तो म्हणाला बारा हजारच दिले होते…
मी आईला परत कॉल केला म्हणलं तो तर म्हणतोय 12 हजारच दिले होते तेव्हा आई म्हणाल्या “नाही रे बाबा मी त्यांच्या घरी गेले होते तर सोम्या बाहेर गेला होता. मग त्याची बहीण होती तर तिच्या कडे देऊन आले पैसे. म्हणल तो आला की त्याला हे दोन हजार दे आणि लगेच पाठवायला सांग ….”
;
मग माझ्या लक्षात सगळा प्रकार आला.
आईला विचारलं तू तिथं जाऊन काय म्हणालीस नेमक. आईने मोजक्या शब्दात सांगितलं “काही नाही सोनू ( लाडाने आई मला सोनु म्हणते ) कडचे पैसे संपलेत सगळे, अजून काम मिळालं नाही म्हणत होता. मित्रा कडून काही घेतले होते ते पण संपले, परेशाणी होतेय खूप, अस म्हणत होता… “अस बोलत बोलत आई सांगून गेल्या. ..
.
आता दोन दिवसांनी तिचा कॉल आला, आणि म्हनल
‘तुला जादु येते कधी सांगितलं नाहीस’
तर ती म्हणाली “कसली जादू”
मी म्हणालो ‘माझ्या आईने 2 हजारच पाठवायला दिले होते तुझ्याकडे ते 12 हजार झाले ना’
ती म्हणाली “माझ्या पेक्षा जास्त गरज सद्या त्या पैश्याची तुलाच आहे आणि अजून लागले तर आता मला सांग. मी देईल दादा कडून घेऊन”
.
आणि खर सांगायचं तर त्या पैश्याची माझ्या पेक्षा जास्त गरज त्या बिचारीलाच होती. तिने ते दहा हजार रुपये खूप दिवसा पासून जमा करत होती. तिला मेकअप चे क्लास लावायचे होते. ते मेकअप चे क्लास लावण्या साठी ती पैसे जमा करत होती आणि जेव्हा जमा झाले तेव्हा मागचा पुढचा विचार न करता तिने मला दिले… आणि पैश्याचा विषय निघेल म्हणून तो विषयच परत कधी काढला नाही तिने.
–
गोष्ट खूप जुनी आहे 2015 – 16 ची.
पण आज या साठी आठवली की, आता एक पोस्ट वाचली त्या मध्ये प्रेमात विश्वास असावा यावरच चर्चा होती. म्हंजे तिथेच म्हणून नाही असंही प्रेम म्हंजे विश्वास एवढच आपल्या लक्षात येत. पण समर्पण सुध्दा तेवढंच महत्वाचं अस्त, हे का कळु नये आपल्याला.
कृष्ण म्हणलं की कृष्ण समोर येतो राधा म्हणलं की राधा. त्या दोघांचही अस्तित्व वेगळं आहे आणि प्रेम म्हणल्या नंतर ते दोघे एकत्र दिसतात, पण जर तुम्ही “मीरा” नाव घेतलं तर ऐकटी मीरा डोळ्या समोर येणारच नाही – कृष्णाच्या भक्तीत तल्लीन झालेलीच मीरा डोळ्या समोर येते त्याच कारण हेच की मीरा च संपूर्ण आयुष्य कृष्णाला ‘समर्पित’ होत. मग समर्पण आल की स्वतचं अस काही तिचं उरलच नाही. सगळ आयुष्यच तीच कृष्ण होऊन गेलं.
ही ताकत असते समर्पणात.
विश्वासाने नाती मजबूत होतात पण समर्पण –
एकमेकासाठी त्याग करण्याची भावना, समजून घेण्याच्या गोष्टी, एकमेकाना आधार देण्याच्या गोष्टी’ या फक्त समर्पनात होतात..
प्रत्येक नात्यात विश्वास असू शकतो पण प्रत्येक नात्यात समर्पण असत नाही. जिथे विश्वास नाही एक वेळ तिथेही भावनेच्या भरात प्रेम होईल पण जिथे समर्पण नाही तिथे प्रेम शक्यच नाही.
विश्वास हा प्रेमाचा श्वास असेल तर समर्पण हा प्रेमाचा आत्माच’
.
हेच सांगायचं होत .
.
.
मितवा ❤️