“प्रेम”
.
प्रेम हा शब्द ऐकला तरी मनाला किती छान वाटत ना’ नाही म्हणजे जे करतात त्यांच्यासाठी बरका` नाहीतर काहिजनांसाठी आज ते प्रेम एक वेळ घालवण्याच साधन आहे तो भाग वेगळा’ पण दुसऱ्यासाठी तेच प्रेम आयुष्य भराची आठवण आहे आणि कुणासाठी आठवणींचा पाऊस …
खर म्हणजे यात मी कुठेच नाही’ कारण माझ्यावर कधी कुणी प्रेम केलंही नाही आणि त्यामुळे प्रेम म्हणजे काय ते अनुभवलं सुद्धा नाही_
प्रेम या बाबतीत मी थोडा कमनशिबिच …
.
खरच माणसाला जगण्यासाठी प्रेमाची आवश्यकता असते का ?? महाविद्यालयात असताना मित्रा कडून ऐकलं होतं माणसाला प्रेमाची गरज असते ;
पण मी तर कधी गरज म्हणून तिच्यावर प्रेम केलंच नाही मी तर प्रेम केलं तिला माझी गरज होती म्हणून …खूप लहान होतो मी जेव्हा तिच्या प्रेमात पडलो_अहो प्रेम कसलं माझा ‘जीवच’ होती – #ती , माझ्या आयुष्यातील आनंदाच्या दिवसाची सुरवात आणि चांदण्यांनी सजलेल्या रात्रीच मला पडलेलं गोड स्वप्नच “ती” ,
माझी जिवलग आणि सोबत माझी जिवलग मैत्रीण…
.
खूप वेळेला काही कारणांनी तिच्या आयुष्यातील आलेल्या अंधाराला ती खूप घाबरलेली पाहून मला मी तिचा मित्र म्हणून कमी वाटायचो’ खूप काळजी वाटायची मला तिची तिला तेव्हा खरोखर एका आधाराची गरज होती आणि मी तिच्यासाठी अपूर्णच होतो पण माझे तिच्या आनंदासाठी चे प्रयत्न मात्र पूर्ण होते ..आणि एकदिवस मी तिला प्रोपोस केला, मी जर नाही म्हणाले तर हा मला बोलणार नाही अशी काही भीती असावी बहुतेक म्हणून ती ‘हो’ म्हणाली …प्रेमाचा प्रस्तावामुळे जिवलग मित्राच्या बोलण्यामध्ये स्वार्थ वाटला बहुतेक तिला_कारण त्या नंतर आज पर्यंत ती मला कधीच काळजी पूर्व बोलली नाही,,,,
बोलली असेलही पण मला कधी काळजी जाणवलीच नाही… काहिदिवसानी नंतर अचानक तिने सांगितलेलं तू करू नको माझ्यावर प्रेम मी नाही तुझ्या लायकीची आणि मी काय बोलणार असुदे म्हणलं नको करू मी करेल’ मला येत करता आणि मीच करत राहिलो …आजही करतो …
.
जेव्हा तुम्हाला कळत की तुमचं प्रेम एकतर्फी आहे तेव्हा सगळ्यात पहिली प्रतिक्रिया तुम्हाला खुप रडायला येत’ कारण तेव्हा तुम्हाला कळत तुम्ही सोबत असूनही एकटे आहात आनि मलाही तेव्हाच पहिल्यांदा कळाल की अरे मलाही रडायला येत आणि मी सुद्धा एकटा आहे तर ….
.
आणि त्या दिवसात तसच होत’ खूप रडायचो ओरडायचो पण काही नाही परत आहे तसच ,
म्हनून तर आजही म्हणतो माझ्या आयुष्यातील बऱ्याच चांगल्या गोष्टींची सुरवात पण तीच आणि शेवट सुद्धा तीच … खूप छान छान कविता करायचो मी तिच्यावर.. कधी तिच्यासाठी …आणि आता तिच्या आठवणींमधे …
_
पण मनापासून त्या कवितांचं कौतून किंवा वाहवा तिला करता आलीच नाही, तिच्यासाठी बनवलेले ते छोटे छोटे व्हिडिओस आजही माझ्याकडे आहेत ज्यावर तिचा फक्त #nice_video कॉमन रिप्लाय यायचा म्हणून तयार करून ठेवलेलं आहेत पण तिला पाठवलेच नाहीत जपून ठेवले असेच आठवण म्हणून ,
कधी जर तिची तब्बेत ठीक नसेल तर रात्री झोप नाही यायची सारखे msg वर msg करायचो राहावयाच नाही मला_ काय करणार शेवटी जीव अडकला होता तिच्यात आणि कॉल तो तर महिन्यांन मधुन 1 कॉल व्हायचा`तो पण मीच केलेला नागीतर तिचा मला कॉल येन म्हणजे तीच काहीतरी काम असणार हे ठरलेलं आणि ती म्हणायची तू केला काय आणि मी केला काय त्यापेक्षा तूच करत जा .. माझे msg वर msg आणि तिचा मात्र खूप शॉर्ट रिप्लाय ,,
बाहेर फिरणं फोन वर तासनतास बोलण हे माझ्या बाबतीत कधी घडलंच नाही आणि तशी तिची इचा सुद्धा नव्हती आणि मला तर तिच्या इच्छे विरुद्ध काही करायचंच नव्हतं ..
.
खूप राग यायचा रडायला ही खूप यायचं पण करणार काय आणि तुम्ही नाही काही करु शकत कारण तुमच्या प्रेमाने साथ दिली तर ते प्रेम तुमची ताकत बनत आणि जर साथ सोडली तर तेच प्रेम तुमची मजबुरी तुमची कमजोरी बनत आणि मी याच कमजोरिचा शिकार होतो मग करणार काय_ खूप attitude असलेला मुलगा होतो मी -सगळा माज उतरवला तिने..#thanks यार मला सुता सारखा सरळ केल्या बद्दल नाहीतर हे दुसऱ्या कुनाला जमलंच नसत फक्त तुलाच जमलं ..

.
मलाही भावना आहेत मला नाही का प्रेम व्यक्त करावस वाटत ,मला नसेल फोन वर बोलावसं वाटत …पण एकदाही आणि एकही गोष्ट मी सांगितल्या शिवाय कधीच कळणार नाही आणि कळली तर समजणार नाही हे तीच नेहमीच ,
खूप केलं तिच्यासाठी पण तिला कळाल नाही आणि मी सुद्धा सांगितलं नाही, कारण_ ते प्रेम होतं ; उपकार नव्हते आणि केलेलं प्रेम बोलून दाखवल की त्याला किंमत राहत नाही म्हणून शांतच राहतो ,
आज पर्यंत कळाल नाही ती माझ्याशी अस का वागायची ____msg चा कधीच पूर्ण रिप्लाय नाही ते अपूर्ण बोलण, व्यवस्तीत काही न सांगणं,, हे सतत तीच चालेल खरतर तिने मला तेव्हा गमावलेलं कारण हे सतत अस वागणं तिची सवय आणि तिला माफ करणं माझी मजबुरी झालेली…
प्रेम करणं नाती जपन व्यवस्तीत बोलण या पैकी तिला काहीच जमत नव्हतं आणि आजही जमत नाही आणि यासाठीच तीची आज आठवण येते यार कशी राहत असेल आता ती …
.
खूप वेळा माझं मन सांगायचं अरे #timepass करते ती सोड तिला पण माझं“हृदय”_ माझ्या हृदयाने मात्र नेहमी तिचीच बाजू घेतली,
ते मला नेहमी सांगायचं_आजही सांगत कदाचित तीची सुद्धा असेल मनापासून प्रेम करण्याची इच्छा पण असतील काही कारण म्हणून नसेल करत ,
प्रेम करतोस तिच्यावर तर आधी विश्वास ठेव’…
_
असही असेल माझी प्रेम करण्याची वेळ चुकीची असेल…कदाचित असही असेल तीच नेहमी नाही कधी मीही चुकीचा असेल ,
अश्या वेळेला काढावी लागते मनाची समजूत’ घ्यावं लागतं समजून-
एकमेकांना दोष देऊन, भांडण करून काहीच नाही होत_जखमा खोल वर कधीही न भरून निघणाऱ्या बनतात त्यामुळे थोडं समजून घ्या.. स्वतःची समजूत काढा’ आणि शांत राहा` हेच मला पटलेलं ..
.
अस काही झालं की सोबत असून सुद्धा नसल्या सारख होत मग नंतर ठरवलं तिने साथ देऊ न देऊ हे प्रेम माझं आहे आणि मला करायचं आहे त्यामुळे मी केलं..मनापासून निभावल …आणि पूर्णत्वाला सुद्धा नेलं …
शेवटी आपलं प्रेम कधीही सजवायच की विझवायच ते आपल्या हातात असत आणि मी ते सजवलं कारण आयुष्यातील गोड आठवणी आहेत त्या मनाला शांत करणाऱ्या आणि हृदयात खोलवर कायम प्रेम जिवंत ठेवणाऱ्या ..
.
मित्र जेव्हा सांगतात त्याच्या प्रेमकथा तेव्हा मात्र मी नेहमी शांत असतो ..कुणाला सांगू ही माझी बोरिंग लव्हस्टोरी, मीच जगतोय या अश्या आठवणीत तेच खूप आहे,
.
आज ती तिच्या आयुष्यात खुश आहे आणि मी माझ्या, आता मी मोठा झालो आणि ती तर खूप मोठी..
आता तिला माझी गरज नाही आणि मी तर कधी गरज म्हनून प्रेम केलंच नाही..
ति आजही तशीच आहे आणि “मी”_मी मात्र आजही तिच्या आनंदासाठी देवाला प्रार्थना करन सोडलं नाही ..
.
प्रेम हे असंच असत का ??
नाही म्हणजे मला माहित नाही कारण ते कधी माझ्यावर कुणी केलंच नाही ..
.
त्या बाबतीत मी थोडा कमनशिबिच….
,
मितवा