प्रेमपत्र १४

प्रेमपत्र – 14

प्रेमपत्र - १४ 🪶

“अव्यक्त प्रेम “
.
मला चांगलं आठवतंय त्या दिवशी मला बेडवरण उठवत ही नव्हतं एवढा ताप भरलेला अंगामध्ये, कुणी हात सुद्धा लावून पाहिलं तर “अरे बापरे ! एवढा ताप ;अस म्हणून मला भीतीच दाखवत होत ,तसा होताच जास्त ताप पण आई समजूत काढायच्या-
नाहिरे; एवढा ताप तुला नेहमीच येतो_ काही नाही` होईल कमी , आणि त्या दिवशी मला पाहण्यासाठी तू आलीस_आपलं भांडण झालेलं असताना सुद्धा’
मलाच खूप वेगळं वाटत होत कारण कितीतरी वेळा तुला मी विनाकारण भांडाव आणि मला माफ करण तर फक्त तुझ्याकडून शिकावं , माझा हातात हात घेऊन बसलेली तू आणि तुला पाहान्याची इच्छा असून देखील डोळे उघडू न शकणारा तुझ्यासमोरचा मी ,
_
‘आताच गार पाण्याची पट्टी टाकुन झाली राहुडे थोडा वेळ’ अस आई सांगत असताना सुद्धा तू परत पट्टी टाकत होतीस-
‘नको काळजी करू होशील ठीक, अशी म्हणनारी तू आणि तुला पाहण्याची इचछा असताना सुद्धा तुला पाहता नाही येतंय म्हणून डोळ्यातील पाणी आवरणारा मी ,
होताच तेवढा ताप; डोळे देखील उघडवत नव्हते की शब्द देखील फुटत नव्हते’ अंगातून गरम चालू वाफा आणि त्या बंद डोळ्यातून भावनेच्या आवेगाने निघणार पाणी आणि त्याला थांबवत असताना निघालेले तुझे ते शब्द आजही मला गच्च मिठी मारतात .
_” अरे होशील लवकर ठीक नको काळजी करू ; मी आहे न’
हे शब्द आई नंतर तुझ्याकडूनच ऐकायला मिळाले __
“काळजी करू नको” म्हणजे ‘मी आहे तुझ्यासोबत आणि कायम असेल’ असाच काहीसा अर्थ होतो का त्या शब्दांचा….. ??
.
त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवशी माझा अर्ध्यापेक्षा जास्त ताप कमी झालेला होता नंतर जेव्हा तुझ्या घरी आलो तेव्हा मला पाहून तुझ्याचेहर्यावरचा तुला झालेला आनंद आजही आठवतो …
_ये तू ठीक झालास आणि जवळ येऊन गळ्या ला डोक्याला हात लावून पाहता पाहता तू माझा हात हातात घेतलास आणि अचानक हात झटकून मी म्हणालो _यार अंगाला हात नको लावत जाऊ बर,
आणि तू म्हणालीस मग कळणार कस ताप किती आहे ??
आणि मी मनातल्या मनात म्हणालो__’ सॉरी यार खूप काही बोलायचं आहे पण सुरवात कुठून करू; तू रागावशील: समजून घेशील’ काहीच माहीत नाही ‘
आणि तुला माझ्या मनातलं कळल्या सारख म्हणालीस “तुला काही बोलायचं आहे का ?? बोल ना काय आहे ??”
मी नाही म्हणत होतो आणि तरीही तू “नाही तुला बोलायचं आहे काहीतरी; पण तू बोलत नाहीस` सांग ना काय तर ?? “
आणि परत तू हात पकडलास आणि यावेळी मी देखील नाही प्रतिकार केला ‘
..
हसायला येत अस काही आठवलं की आणि रडायला ही येत,
कारण कधी काही बोलायची हिंमतच झाली नाही आणि मग शेवट पर्यंत अव्यक्तच राहिलो खरतर त्या दिवशी तुला मनापासून थँक्स म्हन्यासाठी आलो होतो आणि बरच काही बोलायच होत,
पण कश्याच काय तुझ्यासमोर शब्द फुटलतील तेव्हा काही बोलेल न आणि नंतर तर कधीच काही बोलू शकलो नाही …
.
.
…..दोन तीन दिवसापासून सारखा ताप येतोय आणि आज वाढलाय खूप आणि मागच्या सारखा आजही पडून आहे आणि या वेळी डोळ्यातुन ओघळनाऱ्या अश्रूंना पुसन्याच काम तुझी गोड आठवण आणि तू अप्रत्यक्षपणे केलेलं प्रॉमिस करतेय ‘मी नेहमी तुझ्या सोबत असेल’ आणि आज आहेस, तू केलेलं तुझं हे प्रॉमिस आजही तू नसून पूर्ण करतेयस
_उगाच नाही तुझी सादी आठवण जरी आली तरी चेहऱ्यावर हसू येत ; हेच कारण असेल त्यामागे, की तू नेहमी आहेस माझ्यासोबत’ मी घेत असलेल्या प्रत्येक श्वासासोबत …
.
आता होईल उद्या पर्यंत ठीक तू नसलीस तरी त्यासाठी तुझी आठवनच पुरेशी आहे …
..
.
>
मितवा ❤️

मित्रांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *