" प्रिय मैत्रीण " 
.
जेव्हा मला कधी काही सुचत नाही
तेव्हा तू असतेस जवळ एक ‘शब्दकोश’ बनून
तो शब्दकोश म्हणजे तुझी आठवन आणि
त्याच आठवणींमध्येच तू पुन्हा एकदा दिसतेस
एक सोबत “जिवलग” मित्र म्हणून ।
~
मग तू असलीस सोबत की काहीच वाटत नाही
हुरहूर देखील मनाला कसलीच लागत नाही
मी एकटा असलो तरी मला मी एकटा वाटत नाही
कारण त्या एकटेपणाला घालवन्यासाठी
तुझी आठवन आल्याशिवाय राहत नाही ।
~
कधी शब्दानसोबत भांडत असतेस मनामध्ये
तर
कधी तुझ्या आठवणींचं ‘साम्राज्य’ असत मनावर
कधी नवा जन्म घेतेस मनामध्ये तर
कधी ‘हसू’ बनून उमटतेस माझ्या गालावर ।
~
दिसतो मी सगळ्यांना कवी वगैरे पण अस
खरच काहीच नाही ।
मी तर फक्त माध्यम आहे त्या शब्दांना जन्म देण्याचं
त्या प्रत्येक शब्दांमध्ये तूच असतेस आणि
तूच येतेस एक सुंदर ‘कविता” बनून माझ्या ओठांवर ।
_
>
मितवा ❤️