" तक्रार नात्यांची " 🪶

 
_
तक्रारी तर करायच्या आहेत खूप
पण त्या करनार कुनापाशी
ज्यांच्या तक्रारी आहेत त्यांच्यापाशी
की ते ऐकून घेत नाहीत म्हणून स्वता:पाशी
~
आपलं चुकलं तर कुणी समजून सांगत नाही
दुसऱ्याच चूकल तरी दुसरा ऐकून घेत नाही
जो तो आपल्या मर्जी ने अभिमानाने जगतो
आरसा दाखवावा म्हणलं तर 🖤
ज्याचा त्याचा स्वाभिमान दुखावला जातो –
~
बर त्यांची चूक दाखवली तर त्यांना जमत नाही
त्यांना काही समजून सांगितलं तर पटत नाही
मग अस प्रत्येक वेळी घडलं की
आपणच चुकीचे वाटतो
नात्यातील ‘प्रेमाचा’ झरा इथेच खरा आटतो 🍃
~
हे अस काही झालं की
नात्यांच ओझं वाटायला लागतं
आपल्याच नात्यांना जपता जपता
आपल्यालाच नाकी नऊ येत 😥
~
म्हणून आता नाही बोलणार कुणाला
ठरवलं आता स्वता: शीच ;
पण नाही बोलून तरी कसं चालणार
म्हणून भांडत बसतो मनाशीच ….. 💔
~
थोडा वेळ गेला की होत सर्व शांत
आपली नाती जपण्यासाठी एवढं तर करावच लागत
शेवटी काही झालं तरी आपलीच मानस ती
‘आपल्या’ माणसांना आपणच माफ करायचं असत 💝
~
आपल्या माणसांची मन आपनच जपायची असतात
आपल्या माणसांच्या तक्रारी
आपणच पोटात घालायच्या असतात
कितीही भांडण झाले तरी त्यांनाच बसतो गप्पा मारत
त्यांच्याच तक्रारी विसरून:
त्यांच्यातच बसतो ‘प्रेम’ वाटत फिरत ….☺️
~
मितवा ❤️
मित्रांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *