प्रेमपत्र - ४
hallo गणपती बाप्पा ,
सॉरी मी काल रागात तुम्हाला काही पण बोल्लो ….तिचा सगळा राग मी तुमच्या वर काढला ,
मला माहित आहे तुम्हाला माझी खूप काळजी आहे, तुम्ही प्रत्यक्ष माझी काळजी घ्यायला येऊ शकत नाहीत’ म्हणून तुम्ही तिला माझ्या आयुष्यात पाठवल ,
मला तुमच्या कडुन मिळालेलं सगळ्यात छान गिफ्ट आहे ते आणि मी पण खूप काळीज घेतो ना तिची. पण ती ऐकतच नाही, मग येतो ना राग, मला काही वैयक्तिक भावना आहेत की नाहीत,
मला ताप आला आहे हे मी सांगतोय तिला मला बोल मनतोय ,तर बोलतच नवती ‘नुसतं -ओके ,मग, बोल आणखी ,जस काय एखादी गोष्ट सांगतोय मी आणि ती ऐकतेय ,आणि दर वेळेस असच करते ,मग भांडलो मी पण ,
………..पण नंतर किती त्रास झाला मला ,माहित आहे ना तुम्हाला,
काल दिवस भर डोकं दुखत होत आणि ताप पण वाढला, रडायला येत होतं कारण मला माहित आहे, मी तिच्यावर ओरडून खुश नाही ना राहू शकत , आता मीच स्वतः हुन नाही बोलणार तिला जा म्हणावं .. ( फक्त आजच्या दिवस बर का )
.
आई ‘पपा वर खूप प्रेम करते ना ती’ खूप मिस पण करते ती त्यांना ,पण मी सोबत असताना एकदा तरी तिला त्यांची आठवन होऊ दिली का ?
मी तिच्यासाठी तिचे आई_पपा झालो ‘भाऊ_बहीण मित्र_मैत्रिणी ‘ झालो की नाही सगळं ,
सांगा तुम्हीच पडलो का कुठं कमी मी’
तरीपण मलाच त्रास देते,
बगा ना तुम्हीच ……….
बाप्पा फक्त तुम्हाला सांगतोय आ तिला मनु नका’ती रागवेल मला,
पण एक सांगू का खर,
खूप खोटारडी आहे ती ,
मला वचन दिल आहे तिने की ती मला सोडून कुठच जाणार नाही पण खरं सांगू आजून फक्त ती काहीच दिवस माज्यापाशी आहे आणि हे खरं आहे नंतर ती केलेलं #promise तोडून मला सोडून जाणार आहे ,
मग बगा आहे की नाही ती #खोटी, पण केली का मी तक्रार कधी तुमच्याकडे
नाही ना …..
ती आवडते म्हणून प्रेम करतो का मी तिच्यावर, काळजी आहे म्हणूनच करत असेल ना मी पण,
मागच्या वर्ष्यात काय मागितलं ओ सांगा बर तिच्याकडे ? काहीच नाही ….तरी पण मलाच त्रास देते,
.
तिच्या ना एक नाकावर बुक्की मारा तुम्ही,
खूप नाटक करतेय..
गणपती बाप्पा तुम्ही तर बुद्दीची देवता आहात द्या ना तिला थोडी बुद्दी ,
जाऊद्या कशीही असली तरी माझी आहे आणि बोलतेय ती आता,
बस तुम्हाला #thanks मनायचं होत ,
आणि आजून एक #गणपती बाप्पा,
तुम्ही माझी काळजी नाही घेतली तरी चालेल पण तिची घ्या. कारण जर का तिला काही झालं ना,
तर आपल भांडण होईल आधीच सांगतोय पहा …..
.
मितवा .. ( २०१५ )