" खरंच गरज असते का ?? " 
.
खरच गरज असते का ??
आपल्याला कुणाच्या प्रेमाची
कुणीतरी आपलंही असावं
अस खरच वाटण्याची …
खरच आवश्यकता असते का ;
मला प्रेम झालंय:
हे जगाला ओरडून सांगण्याची
गरज असते का खरच ;
आपल्याला तश्या प्रेमाची ..??
_
गरज म्हणून प्रेमाकडे बघितल
की ते गरज संपली की संपणार
रोज रोज प्रेमाचं स्टेटस ठेवण
अचानक एक दिवस बदलणार ..
खरच गरज असते का
प्रेमाला स्टेटस मध्ये ठेवण्याची ??
गरज असते का खरच
माझं हृदय तुटलय
हे जगाला ओरडून सांगण्याची ,
अहो खरच गरज असते का
अस बदलेल जीवन जगण्याची ??
सांगा ना गरज असते का खरच
आपल्याला तश्या प्रेमाची. …;
_
अजिबात नसते .. 
~
जर वाटलंच प्रेम करावंसं
तर ते गरज म्हणून करू नका
गरज सम्पल्यावर ते नात
वाऱ्यावर तुम्ही सोडू नका
प्रेमाचं नात तुटल्यामुळे
जे हृदयावर डाग राहतात
त्यामुळे
आयुष्यातील सगळीच नाती
मानसाला नको नको होतात
प्रेमाला गरज असते फकत
निस्वार्थ एका भावनेची
आणि
गरज असते माणसाला
ती अश्याच खऱ्या प्रेमाची
_
जर तुम्ही बोलण्या आधी
तिला सर्व कळत असेल
तिच्या मनातील भाव तुम्हाला
तिच्या डोळ्यात दिसत असेल
जिथे
रडण्यासाठी काहीच कारण नसेल
आणि हसण्यासाठी
सम्पूर्ण आयुष्य पडलेलं असेल
.
तर ते प्रेम स्वीकारा
आणि तेच प्रेम करा …
.
कारण
.
अश्या निस्वार्थ भावनेने केलेल्या
प्रेमातच
उधळण असते सात रंगाची ;
गरज असते माणसाला
ती
अश्याच खऱ्या प्रेमाची ..
.
मितवा 🪶