" कृतज्ञता " 🪶

 
त्या दिवशी हातात मेडिकल रिपोर्ट’ डोळ्यात पाणी आणि असंख्य विचारांचं वादळ सुरू असलेलं एक हृदय घेऊन मी शिवाजीनगर रेल्वेस्टेशन वर लोकल ची वाट पाहत उभा होतो ;
दिवसेंदिवस मायग्रेनचा वाढता त्रास: जोडीला आता स्मृतिभंश आणि डोक्याच्या पाठीमागे वाढणारी सूज, ज्यामुळे होणाऱ्या असंख्य वेदना आणि त्या वेदना न थांबवू शकणारा मी पैश्या अभावी घेत असलेला प्राथमिक उपचार’
करणार काय ? कुणाला सांगू ही शकत नव्हतो: समजून घेणारच जवळ कुणी दिसत नव्हतं ‘
घरी सांगितलं तर माझं पुण्याला येन बंद आणि घरची परिस्तिथी एवढी नाही की माझा पुढचा विलाज एखाद्या मोठ्या हॉस्पिटल मध्ये करतील ;
आता जवळचे सुद्धा सर्व पैसे संपले म्हणून शांत बसने आणि सहन करणे हा पर्याय मी निवडला …
तेव्हा एका सहज एका मित्राला कॉल केला आणि काही सांगणार की मला समजलं की त्याला सांगितलं की घरी कळणार म्हणून बस थोडा आजारी आहे अस सांगून कॉल कट केला …
तो कॉल ठेवला आणि त्या नन्तर त्या व्यक्तीचा कॉल आला ज्या व्यक्तीची आणि माझी मैत्री होऊन अगदीच काही महिने झालेले होते तशी मैत्री होतीच पण त्या व्यक्तीला मी अजून चांगलं ओळ्खत नव्हतो……💭
मला तेव्हा खूप भावनिक आधाराची गरज होती आणि मला कुणापाशी तरी हे व्यक्त व्हायचं होत आणि ती व्यक्ती मला समोर हवी होती’ मी अस तिला बोलोच आणि गावाकडे महत्वाच्या कामासाठी गेलेली शुभडी काही विचार न करता काम सोडून माझ्यासाठी परत आली,
भेटलो: थोडं बोलो तिच्याशी आणि मी नको म्हणत असताना सुद्धा खूप आग्रह करून तिने मला एका हॉस्पिटल मध्ये अस सांगून ऍडमिट केलं की तुझं बिल एक ट्रस्ट भरते तू नको काळजी करू –
पूर्ण चार दिवस ऍडमिट सम्पूर्ण बॉडी चेकअप बऱ्याच टेस्ट आणि सोबत एमआरआय अस बरच काही तिने करून घेतल तस एवढ्या टेस्ट ची’ मुळात ऍडमिट होण्याची गरज वाटत नव्हती पण तीला बरीच माहिती होती अगोदर त्यातली .. ..
चारही दिवस ती माझ्या सोबत ; डोक्याच्या पाठीमागे आलेल्या सुजेच कारण होत मायग्रेन आणि माझं जास्त विचार करणं हे डॉ. नि सांगितलेलं कारण…
सुट्टी झाली आणि त्यानंतर काही दिवस आराम तेव्हा त्यामध्ये ती तीन वेळा भेटायला आली आणि दोन वेळा परत चेकअप ला घेऊन गेलेली पंधरा-वीस दिवसात पूर्ण ठीक झालो आणि परत ऑफीस जॉईन केलं,
त्या नन्तर जवळपास पूर्णच ठीक झालो’
पण एके दिवशी डोकं खूप दुखत आहे म्हणून हाफ डे घेऊन रूम वरती जाऊन झोपी गेलो’ उठलो तर परत जास्त डोकं दुखतय म्हणून डॉक्टरांना कॉल केला आणि त्यांनी हॉस्पिटल मध्ये बोलावलं,
तपासणी नंतर त्यांनी सांगितलं दुसरं काही कारण नाही बस त्याच गोळ्या परत काही दिवस चालू ठेवा ….
जेव्हा मी तिथल्या मेडिकल वर गोळ्या घेतल्या तेव्हा जवळपास दोन हजार रुपयांच मेडिकल झालं आणि बिलाविषयी आमचं काही बोलणं झालं तेव्हा मला कळाल की ते हॉस्पिटल ट्रस्ट वगैरे वर नाही चालत आणि मागचं बिल दाखवलं असता हे बिल सगळं तुम्ही भरलेलं आहे अस त्यांनी सांगितलं, जवळपास अठ्ठावन्न हजार रुपये बिल होत मी सांगत होतो मी नाही भरलं खरच; तर त्यांनी बिलाची रिप्रिंट मारून दिली_
त्यावर दुसऱ्या पानावर कार्ड पेमेंट केल्याची नोंद होती जी की शुभीच्या नावाची होती आणि माझ्याकडच्या बिलाच तर दुसरं पान फाडलेलं होत;
कदाचित तिनेच फाडलं असावं: तिने बिल भरलं हे मला कळू नये म्हणून:
_
तिला कॉल न करता तसच डेक्कन वरून कात्रज ला तिच्या फ्लॅट वर गेलो’ तिलाही वाटलं अचानक कसा आला आणि तिने काही बोलण्याआधी रिप्रिंट मारलेल बिल तिच्या समोर केल आणि थँक्स म्हणालो…
तिला कळाल मी थँक्स का म्हणतोय तर ; ती काहीच नाही बोल्ली_
” बस इथे; मस्त कॉफी करते आपल्याला मग बोलू “
अस म्हनून पाठ फिरून ति निघून गेली,
खर तर तिला थँक्स म्हण्यासाठी तिच्या रूम वर एवढया लांब गेलोच नव्हतो; थेंक्स तर दुसऱ्या दिवशी ऑफिस मध्ये पण म्हणू शकलो असतो_ तिथे गेलो होतो तिला सॉरी म्हण्यासाठी आणि खाली बसून विचार करत होतो की सॉरी कस म्हणू
‘ऑफिस मधील मैत्री आमची: तिचा स्वभाव खूपच फ्री फ्रॅंक आणि तिच्या अश्या मोकळ्या स्वभावामुळे मी तिच्यापासून दूर होत होतो कारण हे अस मैत्रीचं रूप मी आधी कधी अनुभवलंच नव्हतं म्हणूनच माझा तिच्यावर असा संशय होता की ती माझ्यासोबत फ्लर्ट करतेय; माझ्याशी टाईमपास म्हणून बोलतेय’ ….
किती कमाल असते बघा: काही वेळा ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो: जवळच समजतो ती व्यक्ती आपल्याला फसवते फायदा घेते तरीही त्या व्यक्तीचा आपण प्रेम म्हणून स्वीकार करतो आणि जी व्यक्ती मला मित्र म्हनते माझी काळजी घेते आणि मी साधा तिच्यावर विश्वास नाही दाखवला….
अगोदर दोन वेळा तिच्या रूम वर गेलेलो पण यावेळी एखाद्या अपराध्या सारखा खाली मान घालून तिथे बसलेलो होतो मी;
पण हिम्मत करून तिला हे सगळं सांगून सॉरी म्हणालो आणि ती म्हणाली
“मला माहीत आहे हे सगळं ; पण ते तुझे गैरसमज होते आणि तुझे गैरसमज दूर करण माझं काम होत “
म्हणजे हे सगळं तुला माहीत होत तर’
“हो” पहिल्या पासूनच माहित होत पण विश्वास ठेव मला तुझ्याकडून काहीच नकोय”
आणि तिचा विश्वास आणि तिच्या मनातील माझी जागा तिने व्यक्त केली जी तिने ‘जिवलग मित्र’ म्हणून मला दिली होती …
मला त्या वेळेला काय बोलावं सुचतच नव्हतं; हातातील कप बाजूला ठेऊन तिच्या बाजूला जाऊन बसलो-
डोळ्यात पाणी होत माझ्या 💔 ;
काय बोलू काय तिला ;
तिच्या मैत्री पुढे माझे मोठे शब्द; मोठे वाक्य माझ्या अश्रूंसोबत जोडून सुद्धा खूप कमी प्रतीचे वाटत होते;
मी का घेतला असेल तिच्यावर असा संशय’: जगातील सगळीच मानस वाईट असतात का ?? ‘
एका व्यक्तीच्या अनुभवावरून आपण सगळ्यांनाच त्या नजरेने पाहतो मग नन्तर कळत की आपण चुकीचे आहोत आणि जगात खूप चांगली लोक सुद्धा राहतात…
जेव्हा राज्यसेवा परिक्षेच्या अभ्यासामुळे रिझाईन दिलेलं तेव्हा आमची ऑफिस मधली शेवटची भेट झाली तेव्हा तिने एक पुस्तक दिल होत त्यात सुद्धा तिने माझ्या संशय घेतलेल्या गोष्टीच दुःख व्यक्त केलं होत पण मोठ्या मनाने माफ केलं होत तिने_ कारण काही अनुभव आपल्याला दुसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापासून रोखून ठेवतात हे तिलाही माहीत असावं कदाचित ….
_
माझे खूप चांगले चांगले मित्र आहेत आणि प्रत्येकाची जागा सुद्धा वेगळी’ पण शुभी मात्र खरोखरची वेगळी ..
तिचे माझ्यावर उपकार म्हणून मी तीच नाव घेतो अस नाही उलट तीच खरी “मैत्री” होती जिला कळाल माझ्यासाठी काय आवश्यक आहे आणि तीने प्रत्येक वेळी त्या सर्व गोष्टीसाठी मला वेळ आणि आधार दिला …..
आणि ही घटना तर फक्त आमच्या मैत्रीची सुरवात होती खरी मैत्री तर इथून पुढे सुरू झाली 💐
तिच्या मैत्रीत मला फक्त प्रेम आणि वेळच मिळाला अस नाही तीच पूर्ण ‘#समर्पण’ मला मिळालं आणि माझ्यासाठी स्वताला समर्पित करणारी माझ्या आयुष्यातील ती एकमेव व्यक्ती’ फक्त याच कारणासाठी तिला मी एवढं ‘डोक्यावर’ घेतो __
आयुष्यातल्या खूप गोष्टी मी तिच्याकडून शिकलो.. मैत्री, प्रेम ,नाती सोबत आपल्या माणसांना वेळ देणं आणि आपली ती माणसं जीवापाड जपन हे शिकलो मी तिच्याकडून …
आता ती माझ्या आयुष्यात नाही पण तीच नसणं मला असण्यापेक्षा कमी नाही आणि हेच कारण आहे अधून मधून मी तिच्या आठवणी पोस्ट करतो फक्त एवढ्यासाठीच की मला तिला कधी विसरायचंच नाही उलट मला माझ्या आयुष्यात एक “जिवलग” म्हणून तीच अस्तित्व कायम टिकून ठेवायचं आहे ..
माझ्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठ्या स्टेज वर मला तिच्या नावाचा आणि आमच्या मैत्रीचा पुरस्कार करायचा आहे’ कारण ती फक्त माझी एक मैत्रीणच नव्हती तर माझी ‘ताकत’ माझी ‘प्रेरणा’ आणि आता माझी ‘ओळख’ समजतो तिला मी …
जेष्ठ लेखिका अमृताप्रितम यांच्या ( एमरोस ) मित्राच त्यांच्यासाठी एक वाक्य आहे ते वाक्य माझ्या कडून नेहमीच शूभिला समर्पित असत ;
>
“ये दोस्त क्या हुआ अगर तू साथ नही है ;
तेरे साथ होणे का ऍहसास भी; दिलको सुकून देता है यार।
.
मितवा ❤️
मित्रांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *