एक आठवण ..

" आठवणीतल प्रेम " 🪶

माणसाने प्रेमात किती साधं असावं ??
छोट्या छोट्या गोष्टीत प्रेम शोधणारी ती आणि त्या प्रेमाला आयुष्यभरासाठी सजवणारी ती खूप निरागस आहे . एवढी की कधी त्याने एक चॉकलेट दिलं तर त्याच कवर जपून ठेवते , आठवण म्हणून कदाचित … 🎀
दोन पाणीपुरी कश्याला एकच दोघात बस झाल_ पैसे वाचावे म्हणून नाही ओ प्रेम वाढावं म्हणून .. चहा नाही घेत`पण त्याला आवडतो ना चहा_ मग कर एक मध्येच दोन मी घेईल थोडा .
तास भर बोलून सुद्धा अजून थोडा वेळ दोनच मिनिट प्लीज अस म्हणून अजून काही वेळ हक्काने घेते आणि बोलण्याचा विषय काय .. ?? काय असणार तोच “आपण तिथे भेटलो, ते झालं ; तस झालं.. पुढे अस होणार” ब्ला ब्ला ब्ला .. माणसानं किती साध असाव ?? पारिजातकाच्या त्या छोट्या फुलाच्या प्रेमात माणसान पडाव ज्याला पकडताच येत नाही` इतकं कुणी नाजूक असावं. फक्त पाहता यावं पाहत रहात एवढं ..
नाहीतर त्या ‘ भुई ‘ प्रमाणे जेवढं पकडायला जाल तेवढी ती वर जाणार ..फक्त जवळ जा खाली हात लाऊन धरा; अलगद हातावर बसते ती भुई अगदी तशीच आहे ती ..
तिला पकडायला गेलं की नाही सापडत. तीच मन असेल तर जवळ येऊन बसते. त्याच काम फक्त तिला सांभाळन’ एवढच …❤️
सांगितलं ना मी जास्त काही अपेक्षा नाहीतच तिच्या. बस आज सुट्टी आहे ना तुला`भेटायच ना आपण ?? तू ठीक आहेस; कामात आहेस बोलू शकतोस का ??
तुम्हाला काय वाटतंय परवानगी घेते. अहो अजिबात नाही~ माझ्या बोलण्यावरून तिला फक्त एवढच कळाव की मी तिला टाळतोय बस ऑफिस सुटण्याच्या वेळेला ऑफिस समोर हजर मग : मग प्रश्नोत्तराची हजेरी आणि माझा होणारा पोपट .. 💫
आज मेडम ने हट्ट धरला की आमच्या सोसायटी मधील गणपतीची आरती आमच्याकडे आहे दादा वहिनी करतील तू ये उभ रहा फक्त माझ्या बाजूला .. मी स्पष्ट नकार दिला “कुणी पाहिलं .. काही बोलल.. काही विचारलं म्हणजे मग ?? ”
माहितियेय एक दिवस सगळ्यांसमोर तर यावच लागणार पण माझ्या मते ती वेळ आता तरी नाही म्हणून नकार दिला .. . नकार दिला खरा पण शेवटी गेलोच त्यांच्या आरतीला: म्हणल नाराज होईल_बोलायची नाही भागुबाई .. पण नाही` विश्वास होता तिचा मी येणारच .. मी मागे तिच्या: तिने आरती घेतली आणि काहीतरी पुटपुटली मी हळूच म्हणालो काय मागितलंस देवाला ?? आणि ती म्हनाली “मला माहितीये तू उभा आहेस पाठीमागेच मग काय मागणार “थँकयू बाप्पा” म्हणत होते बस एवढच .. 💌
.
.
.
_ @मितवा … ✍️
( 22 / 08 / 2022 )
मित्रांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *