" आयुष्याच गणित " 
आयुष्याचा आनंद घेतच असतो
आणि मधेच दुःखाचा डोंगर कोसळतो_
ऊन सावल्यांचा खेळ आयुष्यात
असाच काही चालू राहतो
_
कधी मिळते प्रेमाची ऊब
तर कधी कडक उन्हाळा
कधी मिळत भरभरून प्रेम
तर कधी उसना जिव्हाळा …
_
म्हणून कुणाच्या आशेवर नाही तर
स्वतःच्या कष्टावर मिळवायच असत
हरलो तरी ठीक
पण आयुष्य असच जगायच असत
_
कधी जिद्दीने
तर कधी उसनवारी बळ आणायचं असत
स्वतःच्या अस्तित्वासाठी आपण
स्वताच स्वतःशी लढायचं असत …
_
सवय लावायची असते स्वताला
आनंदाने आणि जिद्दीने जगण्याची _
हीच कसोटी असते मित्रा
स्पर्धेत इथे टिकण्याची …
_
पण
स्पर्धेत टिकण्यासाठी खोट हसू चेहऱ्यावर नको,
आनंदासाठी कसलाच दुजा भाव नको ..
आयुष्याकडे नेहमी श्रावणासारखं बघायचं
विसरून दुःखाची होडी सुखाच्या पालविणे फुटायच
_
शिकलेलोच असतो मी हा आनंदाचा खेळ
जमलेलाच असतो तसा आयुष्याशी मेळ
आणि तेवढ्यात
मधेच काहीतरी दुःखाचा डोंगर कोसळतो
आणि
ऊन सावल्यांचा खेळ आयुष्यात
परत असाच काही चालू राहतो ..
–
मितवा