प्रेमपत्र ०८

प्रेमपत्र – ८

प्रेमपत्र - ८ 🪶

मग कशी आहेस ?
परत गेलीस ना’ तुझ्या भावाला विचारलं 10 वेलेस ,नाही सांगितलं त्याने ,तसा मी पण ठीक आहे नको काळजी करू ,
तशी तुला काही काळजी नाहींचय मना ,
नाहीतर अस आर्ध्यात नसतीस ना सोडून गेली ,
तुला एक सांगू तू माझ्या जवळ पण नाहीस आणि माहितेय मला मी हे बोललेलं तुझ्या पर्यंत पोहोचणार पण नाही ,
पण आजही मला तुझ्या वर लिहायला, कविता करायला खूप आवडत ,
तू नाहीस जवळ माझ्याशी बोलायला पण तुझे ते शब्द आजही आठवन बनून कानापाशी घोंगत असतात सारखे ,
-कुठे गावी जात असताना ,”ये कुठे जातोएस ,मला न सांगताच’ बर परत कधी येणार ,मला काय आणशील “,
-स्टडी करायचं सोडून टाइमपास करत बसलो की परत तुझे शब्द आठवतात “सूर्या तूना एक no चा आळशी मानुस आहेस, मला न तुझ्या सारखे आळशी लोक आजिबात आवडत नाहीत” आणि मी परत स्टडी करायला बसतो…
-कधी नवीन ड्रेस घातला की लगेच “वा काय दिसतोय माझा हिरो ” आणि मनानेच मनाला हसतो मी…
.
ते हसू गायब झालय कधीच😒 ,हसायचा प्रयत्न करतो तसा बळच पण ते बरोबर नाही दिसत म्हणून शांत असतो आजकाल, कविता सूचन पण बंद झालंय  ,

जास्त आठवण नाही येत, पण जेवढी येते तेवढी डोळ्यात पाणी आणते एवढंच ,,
.
तू आता माझ्या आयुष्यात नाहीस हे मान्यच करत नाही ग माझं हृदय, तुझं अस्तित्व मी नाकारुच शकत नाही, माझ्या आयुष्यात माझ्या जवळ दर वेळेस आठवण बनून येतेस तू ..

.

मितवा ….❤️ ( २०११ )

मित्रांना पाठवा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *