प्रेमपत्र - ७
मग कशी आहेस ?
आता सहज तुज्यावर एक कविता सुचली , लिहिली आणि पान फाडल ,,,,,हे माझं नेहमीचंच ‘
तुला माहीत आहे ना, मला मनात ठेवायला काही आवडत नाही ‘
आणि मनातलं बोलाव तर समोर तू नाहीस, मग काय करणार, काही सुचलं की कागदावर उतरवतो आणि नंतर फाडतो तो कागद,
सोबत ठेऊन तरी काय करू परत वाचलं तर परत तुझी आठवण येणार त्यामुळे फाडूनच टाकतो ,,
_ एका मित्राने परवा तुझ्यावर केलेली कविता वाचली ,छान आहे म्हणाला पण ,सगळ्यान सारख हाही तेच म्हणाला जे मला ऐकायला नको वाटत ,आयुष्य बरबाद करतोयस म्हणत होता ,जी मुलगी तुझ्या आयुष्यातच नाही आणि कधी येणार पण नाही तिच्या आठवणीत कश्याला मरतोस म्हणत होता ,
_त्याला हे माहीत नव्हतं कदाचित त्याने जी कविता वाचली ती कविता करायलाच तू मला शिकवलं ,
नाहीतर मी, साधं लिहायला वाचायला येत नव्हत तेव्हा माझ्या हातात पेन देऊन मला शिकवणारी तू , तू कुठं महितियेयस सगळ्यांना ,
.
तुला एक सांगू ,मागच्या आठवड्यात एका मुलीने मला .. .. केला, क्लास मधेच, मी कारण विचारलं अस का ? तर सांगत होती, कुठल्याही मुलीला सगळ्यात जास्त हेच आवडत आपल्या साठी कुणीतरी तरी खुप झुरण, आपल्यावर खूप प्रेम करण, आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपल्या माघारी सुद्धा आपल्या सोबत प्रामाणिक असणं ,
मी म्हणलं हो आवडत आणि असतात या सगळ्या गोष्टी प्रेमात ,
तर म्हणाली ,नाही’ या सगळ्या गोष्टी प्रेमात असतात पण सगळ्यांच्या प्रेमात नसतात ,
जी मुलगी तुझ्या आयुष्यात नाही तिच्यावर तू एवढं प्रेम करतोस ,आज तिच्या माघारी सुद्धा तिच्याशी प्रामाणिक आहेस आणखी काय ,मीच इम्प्रेस आहे या गोष्टींमुळे तुज्यावर ,
मी सांगितलं म्हणलं “नाही”, प्रेम नाही माझी फक्त ती मैत्रीण आहे ,
तर म्हणाली ,मी तुझ्या खूप कविता वाचल्या तुझ्या कवितेतला प्रत्येक शब्द हेच सांगतो की तुझं तिच्यावर खूप प्रेम आहे, मग तू कितीही लपव ,,,,,
,
मी सांगितलं अस काही नाही तर ऐकतच नव्हती ,
म्हणाली मग अस काही नाही तर मला ‘हो’ म्हण ,
आता काय बोलू तिला तूच सांग ,
आपलं नाहीयेय #प्रेम मला माहीतियेय ‘कारण ,
‘प्रेम जर असल असत तर अस मला एकट्याला सोडून तू गेलीच नसतिस ‘
बरोबर बोल्लो ना मी …?
.
.
मितवा ….❤️