प्रेमपत्र - ९
मग कशी आहेस… ??
रात्री मित्राच्या घरी वाढदिवस पार्टी होती ,त्याच्या बहिणीचा वाढदिवस होता ,गेलो शुभेच्या दिल्या 💐💐नंतर त्याची बहीण बोल्ली मला ,मला नाव नव्हतं माहीत म्हणून सहज विचारलं आणि तिने तीच नाव सांगितलं आणि माझ्या चेहऱ्यावर एक हसू आल ,तरी तिने विचारलं अस का हसलास ? मी म्हणालो काही नाही असच ,तर म्हणाली असच नाही काहीतरी कारण असेल, तुझ्या जवळच्या कुणाचं नाव आहे का हेच ? आणि मी ‘हो’ म्हणालो …
तुझंच नाव होतं ते ,😊
.
मी कितीजरी तुला लपवण्याचा प्रयत्न केला तरी कुठेतरी तू माझ्या समोर आठवण बनून ,#smile बनून येतेसच…
तसतर तुला विसरायचा विचारच मनातून काढून टाकलाय आता कारण कळून चुकलंय तुझ्या शिवाय आता कुणी नाही माझं भलेही आठवणीतच का असेना ,
बाकी प्रत्येकाने तर स्वतःच्या पद्धतीने फायदा घेतला माझा,
एक बोलू , प्रत्येकाला हवं असत कुणीतरी आपल्या व्यतिरिक्त म्हणून निवडल मी ही कुणालातरी खूप कंटाळा आला होता एकटेपणाचा ,
तुला विसरण्यासाठी एका मुलीची मी स्वतःला सवय लावून घेतली होती, खूप ,
या मध्ये मी तुला विसरलो किंवा तिच्याससोबत टाइमपास केला अस आजिबात नाही, प्रत्येकाची जागा वेगवेगळी आहे, आणि ती कायम असणार…जरी स्वतःच्या फायदयसाठी मी हे केलं असल तरी पण स्वतः पेक्ष्या जास्त काळजी केली मी तिची,एका शब्दाने तीच मन दुखणार नाही इथपर्यंत, एवढंच काय तिच्या चुका सुद्धा तिच्या सवयीचा भाग म्हणून माफ केल्या, काय करणार करावं लागतं शेवटी मानूस महत्वाचं असत त्याच्या चूका नाही आणि एवढं करून तिने मला काही दिवसा पूर्वी #msg काय केला सांगू ,”मला call ,msg करू नको ” its ओके म्हणलं नाहीतर नाही त्यात काय ,,
गरज संपली’ माणसाची किंमत शून्य ,
जाऊदे ,,,,
या सगळ्या पासून खूप दूर आहे आता, आता नको कुणीच, अस नाही की कुणी भेटत नाही,भेटतात खूप ‘पण तुझी आणि त्यांची बरोबरीच होत नाही ,
म्हणून एकटाच आहे आता ,एकटा कसला तुझ्या #आठवणी आहेत ना सोबत बाकी प्रेम पण नको आणि मैत्री पण नको आता कुणाची ….
आता फक्त तुझी आठवण आणि माझा एकटेपणा,
खरतर जवळच्या माणसाच्या आठवणीच छान असतात कारण माणस साथ सोडतात “आठवणी” कधीच नाही ..
.
मितवा ….❤️ ( २०१४ )