प्रेमपत्र ११

प्रेमपत्र – ११

प्रेमपत्र - ११ 🪶

मग कशी आहेस ??
गेली 7 वर्ष तुला विसरण्याचा प्रयत्न करतोय आणि परत परत तुझ्या आठवणीत आणखी खोलवर रुतत जातोय ,
एवढ्या दिवसा नंतरही तुझी प्रत्येक आठवण मनाला लागते ,
काही आठवणी हसवतात काही रडवतात आणि काही विचार करायला भाग पाडतात ,
खूप भांडायचो ना ग मी तुझ्याशी खूप ,रडकुंडीला आणायचो पार तुला, रडायचीस आणि तरीही उद्या जर मी गृहपाठ नाही केला तर मला सर ओरडतील म्हणून तेवढ्याच काळजीने भांडण झाल्या नंतर सुद्धा माझा गृहपाठ पूर्ण करून द्यायचीस,कधी साधी तक्रार सुद्धा केली नाहीस ,
लहान होतो  त्या वेळेस खूप , कळत नव्हतं काहीच ,
मैत्री, 🍀 प्रेम ❤ कुठं काय माहीत होतं ,सोबत जगायचं होत फक्त ,
बालपणीच नात ,माहीत नाही प्रेमाचं असत की मैत्रीचं,मला फक्त एवढं माहीत आहे की त्या नात्यात मैत्रीच्याही पुढे प्रेम खूपं असत’ जे आज माझ्याकडे आहे -तुझं प्रेम ❤, आठवणींच्या रुपात ,
रोज रात्री भांडण करून परत सकाळी हाताला धरून शाळेत न्यायचीस ,
जवळपास  विसरलो होतो मी हे सगळं मुद्दामून ,
कारण तुझी एवढी सवय लागली होती ना की तू गेल्या नंतर मी एका क्षणात “एकटा” झालो ,
खरतर स्वतःपासून सुद्धा परका झालो.  खूप एकटा अनुभवत होतो स्वतः ला ,अस पण वाटायला लागलं होतं की तू तर मला विसरली पण अशील आणि मीच एकटा तुझ्या आठवणीत झुरतोय ,म्हणून तुला विसरण्यासाठी प्रयत्नही केले खूप,,,,,,,,,
.
पण खरं सांगू त्या दिवशी तुला भेटलो आणि होते नव्हते तेवढे गैरसमज दूर झाले आज एवढ्या दिवसा नंतर सुद्धा मला तुझ्या डोळ्यात तोच ‘मी’  दिसलो ज्याला तू आजूनही सांभाळून ठेवलं आहेस ,
कळून चुकलकी तुझ्या मनात आजही माझ्यासाठी खूप जागा आहे ,खरच ना एवढा मोठा झालोय पन अजूनही अक्कल नाही मला ,
तू तू आहेस खरच ,मी सगळ्यान पासून तुला लपवल अगदी स्व:त पासून सुद्धा ,तुझ्यासाठी लिहिलेल्या कवितांखाली सुद्धा कधी तुझं नाव टाकल नाही. किती मोठा गुन्हेगार आहे  मी तुझा ,
जवळ होतीस तेव्हा तुझी किंमत नव्हती आणि आता खूप किंमत आहे पण जवळ तू नाहीस. 😌

मी पण, हे बघ आता मी अजिबात कुणापासून सुद्धा तुला लपवत नाही सांगत असतो बिनधास्त ,आहे एक बालमैत्रिन तिच्यासाठी लिहितो  म्हणून , मी पण नाही  विसरलो तुला ,
नाही विसरलो हातात पेन देऊन तू मला शिकवलेलं ,
नाही विसरलो मी जेव्हा जेव्हा पडलो तेव्हा तू मला उचलेल, आजिबात विसरलो नाही मी जेव्हा मला  माझ्याच लोकांनी नाव ठेवले आणि तू मला तेव्हा प्रोत्साहन दिलंस ,
काहीच नाही विसरलो सगळं आठवत जशास तस म्हणून कदाचित आज मी इथपर्णत पोहोचलो आहे. कारण माझ्या प्रामाणिक प्रयत्नांना मनापासून पाठीवर थाप देणार होत कुणी तरी माझ्याकडे आणि आजही आहे ,
इथून पुढचा प्रवास तुझ्या आठवणींसोबत ,
“बदला’ म्हणून ,
…..लहानपणी मी तुला परेशान केलं आणि आज तुझ्या आठवणी मला परेशान करतात ,
पण तरीही मला तुझ्या आठवणीच आवडतात, कारण तू मला एकट्याला सोडून खूप दूर गेलीस पण तुझ्या आठवणी आजही माझ्या सोबत आहेत ,
.
कधी वेळ मिळाला तुला तर एकदा ये आणि माझ्या हृदयाचा दरवाजा उघडून बघ ,हृदयाच्या भिंतीवर तुझ्या आठवणींना खूप छान सजवलेल आहे मी .
.
.
मितवा …. ❤️ ( २०१७ )

मित्रांना पाठवा