प्रेमपत्र - १०
मग कशी आहेस ??
काही नाही सहज आठवण आली ,अस पण तुझी आठवण यायला कारण कुठं लागत ,
लायब्ररी मध्ये परवा एका मुलीने माझा नंबर घेतला होता चांगली वाटली बोलायला म्हणून मी पण बोल्लो सहज आणि तिने आज msg केलाय आय .. यो म्हणून
म्हणजे बघ ना किती फास्ट झालंय ना जग,
नाहीतर 10 वर्ष तुझ्या सोबत राहिलो पण i love you ❤ सोड i like you🙋 मनायची पण हिम्मत झाली नाही कधी…
नाहीतर यांना ,
दोन दिवसात प्रेम होतं तिसऱ्या दिवशी बोलून टाकतात आणि एक न सांगण्या सारखी गोष्ट सांगू ‘नकार जर मिळाला तर चौथ्या दिवशी दुसरं कुणी तरी बघतात’
खर आहे हेच ,
प्रेम फक्त नावापुरत राहिलंय सद्या जगात ,
खर प्रेम करणारेही आहेत जगात पण खूप कमी ,
बाकी खूप घाई आहे सगळ्यांना कोण कुणासाठी थांबत नाही आणि कोण कुणाच्या आठवणीत रडत नाही ,,,
.
मिच का असा तुझ्या आठवणीत गुंतलोय काय माहीत ??
बघ ना 10 वर्ष तुझ्या सोबत राहिलो,
मनात असून, सगळं माहीत असून,, मी तुझ्या समोर मनातील भावना व्यक्त नाही करू शकलो आणि आजही नाही करू शकत,
.
आता फायदा नाही तो भाग वेगळा ,
पण आजही तुझ्या समोर येण्याची किंवा तुझ्या डोळ्यात डोळे घालून बोलायची हिम्मत नाही माझ्यात ,
………तू फक्त आवडतेस म्हणून नाही तर त्याही पुढे प्रेम आहे ना म्हणून ,
आवड आणि प्रेम यातील फरक सांगू तुला, आपल्याला एखाद्य फुल छान वाटणे आणि ते तोडून आपण आपल्या जवळ ठेवणे ही आवड आहे आणि यात आपला स्वार्थ असतो की ते छान फुल माझ्याकडेच आहे आणि माझ्याकडेच असावं म्हणून तर तोडून जवळ घेतो ,
पण ,
काहीजण असेही असतात जे त्या फुलाची खूप काळजी घेतात , त्याला इजा होऊ नये त्याच आयुष्य आणखी वाढाव, त्या फुलाने आणखी आनंदात फुुलाव म्हणून… आणि तो “मी” आहे ,😌
तू जवळ नसताना आजही तुझी काळजी करणारा आणि काही फायदा नसतानाही तुझ्या आनंदासाठी देवाकडे प्रार्थना करणारा ,”मी” ….🍀
.
तुला एक सांगू कदाचित माझं तुझ्यावर प्रेम आहे ,पण हे फक्त मला माहित आहे ,
ते मी माझ्या हृदयाला कधीच नाही कळू देत आणि कधीच नाही कळू देणार कारण तुझा खूप राग आहे माझ्या मनात ,,,,,,⏸
माझ्या मित्रा पाशी सांगू शकलीस मी तुला आवडतो पण मला सांगितलं नाहीस कधी ,त्याने सांगितलं होत मला नंतर पण मला मला तुझ्याकडून ऐकायचं होत आणि नेमकं तू तेच नाहीस केलं म्हणून ,
म्हणून राग आहे माझ्या मनात ….
खूप ऐकायचं होत ,,खूप बोलायच होत ,,,पण कधी सुरवातच झाली नाही ,😒
.
.
जाऊदे ,
अस पण त्या आठवणी आहेत आणि आठवणी या न काढलेल्या बऱ्या कारण त्या रडवतात आणि डोळ्यात पाणी आल्या नंतर दर वेळेस ते मलाच पुसाव लागत ,
तू थोडच येणार आहेस पुसायला …..
.
काळजी घे…
Always miss u …..
.
मितवा ….❤️ ( २०११ )