" आज मनापासून वाटल " 
आज मनापासून वाटलं
तुला पुन्हा एकदा भेटावं
खूप आठवण येतेय तुझी
तुला एवढंच एक सांगाव.
.
आजही शब्दात, अर्थात
अन ओळींमध्ये तुलाच बघतो मी
आजही तुझ्या आठवणीत रमून
स्वता:लाच हसतो मी ,
..
तू एवढा त्रास देऊन हि
आजही तुझीच आठवण येते
माझ्या प्रत्येक रात्रीच्या झोपिला
आजही तुझीच शप्पथ लागते
…
तुझ्या पेक्ष्या
तुझ्या आठवणींनाच माझी काळजी
त्या हळुवार येतात भेटून जातात ,
मनात घर मात्र हक्काचं करून जातात
.
खरच
आज मनापासून वाटलं
तुला पुन्हा एकदा भेटावं
खूप आठवण येतेय तुझी
तुला एवढंच एक सांगाव
.
मितवा 