" अनोळखी " 
तशी ओळख म्हणलं तर ऑफिस मध्ये सोबत होतो आम्ही
नाव महत्वाचं नाही मी बस ‘ती अशी एकटी का राहते रे ??
एवढंच मित्राला विचारलं – नवीन होतो मी त्या ऑफीस मध्ये ..
“काही नाही रे असाच आजारी असल्याचा आव आणायचा आणि काम चूकार पणा करायचा; मस्त जमत यांना: होत नाही तर त्या पेक्षा काम सोडून घरी बसायचं न” तोंडावर निर्दयी भाव आणत मित्राने सांगितले …
पाहिलं काही दिवस ऑफिस मध्ये आमच्या आठ जणांच्या टीम मध्ये ओरडा खाणारी ती एकच व्यक्ती आणि तिच्या मुळे बाकीच्यांना सुद्धा बॉस ची बोलणी पडायची’
विचारल मित्राला ..
‘मग तिला कुणी विचारत नाही का ?? का अस करतेस ?
का काम करत नाहीस; अडचण काय तुझी..??
“अरे भांडायला लागते; तुम्हीच खूप काम करता तुम्ही खूप चांगले मीच वाईट आहे असं बोलते काही ही” मित्राने एका श्वासात सांगितले ..
“
वाढदिवस होता तिचा त्या दिवशी आणि आम्ही एका टीम मधील पण कुणी साद्या शुभेच्या सुद्धा नाही दिल्या:
तोंडावर नाही आणि टीम वॉट्सअप ग्रुप मध्ये सुद्धा नाही ..
निघण्याची वेळ झाली तेव्हा मी जवळ गेलो तिच्या आणि ती
“हे बघ मी व्यवस्तीत काम करतेय नेटवर्क प्रॉब्लेम आहे: नेट नाही पकडतय माझा पीसी” अस गडबडीत बोलून गेली ..
मी शांतपणे
“नाही इट्स ओके मी केलं तुझं काम तुझा लॉगिन आहे माझ्याकडे-
मी आता बस शुभेच्या द्यायला आलेलो आज वाढदिवस आहे ना तुझा ??
आणि ती एकदम आश्चर्यचकित होऊन बघायला लागलेली एकवेळ मोबाईल चेक केला कुणाचाच msg नाही किंवा कॉल ही नव्हता बहुतेक आणि तिला खरोखरच माहीत नव्हतं तिचा वाढदिवस आहे ते ..
शुभेच्या दिल्या आणि कॉफी ऑफर केली आणि आली ती लगेच- डोळ्यात पाणी होत तिच्या ..
आणि मी हलक्या अंदाजात विचारलं
‘फोनवर मोठ्याने बोलण्याचा आजार आहे की सवय ?? ‘
आणि तिने फक्त “अंममम” म्हणत कळून न कळल्या सारख केलं.
झालं थोडं बोलणं तेव्हा कळाल तिचा घटस्फोट झाला आहे आणि तिला सगळे दोषी ठरवत होते. म्हणून तिचा निर्णय घेऊन घर सोडून आलेली ती:
इथेही तिला समजून घेणार मिळालंच नाही कुणी ..
तीच ऐकून घेतलं आधी आणि मग सांगितलं तू घेतलेला निर्णय योग्य आहे काळजी करू नको होईल सगळं ठीक जेव्हा विचार करून काहीच होत नाही तेव्हा विचार करणं सोडावं माणसानं” . तर ही होती तीची अडचण’ मनसोक्त रडून मोकळी झाली बिचारी` भेटतच नव्हतं वाटत कुणी रडण्यासाठी आणि माणूस कितीही मोठा झाला तरी एकटेपणा ही अशी गोष्ट आहे जी त्याला रडायला भाग पाडते ..
–
तर मला सांगा प्रत्येक मनाविरुद्ध वागणारी व्यक्ती किंवा चांगली असणारी व्यक्ती खरोखर वाईट असते का ? काही तरी कारण असेल त्या मागे ती जर अचानक वेगळं वागत असेल ..
विचारा जवळ जाऊन जर असेल कुणी जवळच तस .. ;
आहेत ना बरेच जण आपल्या आजूबाजूला कुनाला विरहाच दुःख आहे- कुणाला नात्याचं ओझंय; कुणाला जगन नकोस झालय आणि कुणाला जगणं म्हणजे काय हेच कळेनासं झालय ..
तीन वर्षाचा काळ उलटला मध्ये आता मागच्या महिन्यात लागलेल्या राज्यसेवा निकालात तिची अधिकारी पदावर निवड झालीयेय आणि त्या साठी ती मला “धन्यवाद” म्हणत होती … आणि मी काय केलेलं फक्त मैत्रीचा हात पुढे केलेला आणि प्रेमाचे दोन शब्द त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात प्रोत्साहित करण्यासाठी- त्या बदल्यात त्या व्यक्तीच्या आयुष्यात मला किती मोठं स्थान मिळालं बघा ..
कुणाला समजून घेण्या अगोदर त्या व्यक्तीला नाव कधीच ठेऊ नका: जमलंच तर जवळ जा आणि मैत्रीचा हात पुढे करा कदाचित ती व्यक्ती स्वतःच्या आयुष्याला कंटाळली असेल आणि तुमच्या मैत्री मध्ये त्या व्यक्तीला भविष्य दिसेल ..
–
मितवा 